पाच हजारांची लाच घेताना वरिष्ठ लिपिकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

भंडारा : वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करून थकबाकीचे बिल मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविण्यासाठी जिल्हा कोषागारातील वरिष्ठ लिपिक प्रकाश इसराम पटले याने पाच हजारांची लाच मागितली. बुधवारी त्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.
यातील तक्रारकर्ता शासकीय कर्मचारी आहे. त्याच्या सेवाकाळात ऑगस्ट 2001 पासून आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ, पदोन्नती साखळीतील वरच्या पदाची वेतनश्रेणी लागू झाल्याची थकबाकी आणि सहाव्या वेतन आयोगाचे पाच हप्ते असे 11 लाख 63 हजार 490 रुपयांचे बिल जिल्हा कोषागारात प्रलंबित होते.

त्याबाबत त्यांनी कोषागार कार्यालयात जाऊन वरिष्ठ लिपिक प्रकाश पटले याच्याकडे विचारपूस केली. त्यावर त्याने बिल तपासून वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यास पाच हजार रुपयांची मागणी केली. संबंधिताने 15 जुलैला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली. 15 व 18 जुलैला पडताळणीदरम्यान वरिष्ठ लिपिकाने लाच घेण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्यात प्रकाश पटले याने तक्रारकर्त्याचे 11 लाख 63 हजार 490 रुपयांचे बिल तपासून मंजुरीसाठी वरिष्ठाकडे पाठविणे व बिल काढून देण्यासाठी पाच हजारांची लाच घेतल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक महेश चाटे, पोलिस निरीक्षक योगेश्‍वर पारधी, हवालदार धनंजय कुरंजेकर, सचिन हलमारे, पराग राऊत, शेखर देशकर, कोमलचंद बनकर, सुनील हुकरे, दिनेश धार्मिक यांनी केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: senior clerk arrested accepting bribe of rs five thousand