प्राणघातक हल्लाप्रकरणी आरोपीस सश्रम कारावास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

यवतमाळ : प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेटकर यांना सोमवारी (ता.30) दिला. अनिल नागोराव राठोड, असे पाच वर्षे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

घाटंजी तालुक्‍यातील शिवणी येथे 28 एप्रिल 2015ला सायंकाळी जयसिंग रायसिंग राठोड (वय 40, रा. देवनाळा, ता. कळंब) यास तिघांनी रस्त्यात अडवून मारहाण केली. जयसिंगच्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हाचा तपास पोलिस निरीक्षक शिवा ठाकूर यांनी करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या खटल्याचा निकाल सोमवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेटकर यांनी दिला. अनिल राठोड यास पाच वर्षे सश्रम कारावास, नारोराव राठोड व सचिन राठोड यांना 324, 34 भादंविमध्ये 15 दिवस साधा कारावास व प्रत्येकी पाचशे रुपये दंड, दंड न भरल्यास पाच दिवस साधा कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता उदय पांडे यांनी बाजू मांडली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sentenced to work imprisonment for assault