महत्त्वाचा निर्णय : महिलांसाठी आता वेगळे कोविड हॉस्पिटल, का घेतला हा निर्णय  

 Separate Kovid Hospital for women in Amravati
Separate Kovid Hospital for women in Amravati

अमरावती :  जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांमध्ये कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून आल्याने प्रसूतीसाठी येणाऱ्या कोविड पॉझिटिव्ह महिलांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालयाची उभारणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सध्याच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाजूलाच असलेल्या इमारतीमध्ये हे महिला कोविड हॉस्पिटल सुरू होणार असून त्याची रुग्णक्षमता 75 ते 80 एवढी राहणार आहे.

सविस्तर वाचा - कॅप्टन दिपक साठे, 84 वर्षांच्या आईला देणार होते सरप्राईज्


 
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, सध्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या महिलांपैकी 21 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या असून, त्यांच्यावर कोविड हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रसूत महिला व नवजात बाळांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था असली पाहिजे या हेतूने स्वतंत्र रुग्णालय तयार केले जात असून, येत्या चार ते पाच दिवसांमध्ये ते सुरू होईल. सध्याचे सुपर स्पेशलिटीमधील कोविड रूग्णालयाची रूग्णक्षमता 150 असून त्यामध्ये वाढ करण्यात येऊन ते 250 बेड्सचे करण्यात येणार आहे. याशिवाय शहरातील खासगी कोविड रुग्णालयांची रुग्णक्षमतासुद्धा वाढविली जाणार आहे.

इर्विनमध्ये होणार उपचार


छातीमध्ये दम भरून आल्यानंतर अनेक जण कोविडची तपासणी करतात. त्यांचा वैद्यकीय अहवाल येण्यास उशीर लागतो. या दरम्यान अशा रुग्णांना धोका उद्भवू नये, यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 9, 10 व 11 मध्ये अशा रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. सद्या 35 बेडस्‌ असून त्याची क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
 

180 होम क्वारंटाइन


कोरोनाची लक्षणे नसलेल्या 180 रुग्णांना होम क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर आरोग्य पथक तसेच ईर्विनमधील हेल्थलाईनची मंडळी लक्ष ठेवत असून अधिक त्रास होणाऱ्या रुग्णांना कोविड रुग्णालयात दाखल केले जाईल.
 

खासगी रुग्णालयातील दर निश्‍चित
कोविड रुग्णांची खासगी रुग्णालयाकडून होणारी लूट थांबविण्यासाठी शासनाकडून खासगी रुग्णालयातील उपचाराबाबचे दर निश्‍चित करण्यात आले आहेत. अमरावती शहरातील खासगी कोविड रुग्णालयांना हे दर लागू राहणार असून रुग्णालयाच्या दर्शनी भागात उपचाराच्या दराचे फलक लावण्यात येतील.
शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, अमरावती

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com