21 लाख मतदार निवडणार सात 'आमदार'

file photo
file photo

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात जिल्ह्यातील सात जागांसाठी एकूण 87 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उद्या सोमवारी (ता.21) जिल्ह्यातील 21 लाख 75 हजार मतदार आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. मतदानासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सातही मतदारसंघांत आवश्‍यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आज रविवारी (ता.20) येथील धामणगाव रोडवरील महिला शासकीय तंत्रनिकेतन येथून निवडणूक साहित्य घेऊन "पोलिंग पार्ट्या' मतदान केंद्रांवर रवाना झालेल्या आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी राळेगाव, वणी, दारव्हा, पुसद या ठिकाणी भेट देत तयारीचा आढावा घेतला.

जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदासंघांसाठी एकूण दोन हजार 499 केंद्रांवर मतदान घेण्यात येणार आहे. सात मतदारसंघांत 21 लाख 75 हजार मतदार आपले लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाची आवश्‍यक ती तयारी पूर्ण झालेली आहे. दरम्यान, आज दोन हजार 499 मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या रवाना करण्यात आलेल्या आहेत. यासाठी तब्बल 585 वाहनांचा वापर करण्यात आला आहे. साहित्यात इव्हीएम मशीन, प्रदत्त मतपत्रिका, ग्रीन पेपर सील, पट्टी सील, सिलिंगसाठी लाख, मेनबत्ती, शिक्के, पाकीट आदी वस्तू देण्यात आलेल्या आहेत. सकाळी दहा वाजेपासून पोलिंग पार्ट्या रवाना करण्याला सुरुवात झाली. दुपारपर्यंत पोलिस व कर्मचारी यांच्या उपस्थितीत सर्वसाहित्य मतदान केंद्रांपर्यंत पाठविण्यात आले. मतदानावर लक्ष राहावे, यासाठी जिल्हाभरात 235 झोन तयार करण्यात आलेले आहेत. या निवडणूक प्रक्रियेत 15 हजार कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. त्यात दहा हजार 996 कर्मचारी, तर साडेचार हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 250 केंद्रांतून मतदानाचे वेब कास्टिंग करण्यात येणार आहे. 

बस नसल्याने प्रवाशांचे हाल
निवडणूक साहित्य मतदान केंद्रांवर पाठविण्यासाठी रविवारी (ता.20) जिल्हाभरात 587 वाहनांचा वापर करण्यात आला. त्यात 353 जिप, 208 बस, नऊ मिनीबस व 15 ट्रकचा वापर करण्यात आला. एकूण 208 बस निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने सकाळी अनेक बसफेऱ्या प्रभावित झाल्या. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

मतदारसंघांनिहाय मतदार
वणी-2,84,497
राळेगाव-2,83,160
यवतमाळ-3,84,160
दिग्रस-3,22,355
आर्णी-3,11,969
पुसद-2,93,158
उमरखेड-2,92,870

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com