यवतमाळ ब्रेकिंग : सात महिन्यांची आढळली कोरोना पॉझिटिव्ह 

 Seven-month child corona positive in Yavatmal
Seven-month child corona positive in Yavatmal

आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील अंतरगाव येथील सात महिन्यांच्या चिमुकलीवर यवतमाळ येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनासदृश लक्षणे असल्याने तिची कोरोना चाचणी करण्यात आली. दरम्यान, तिचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 

आर्णी तालुक्‍यातील अंतरगाव येथील सात महिन्यांच्या मुलीला पंधरा दिवसांपूर्वी हगवण लागली होती. तिच्यावर आर्णी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारांनी तिच्या प्रकृतीत काहीच फरक जाणवला नाही. त्यामुळे तिचे वडील, आई व आजीने तिला यवतमाळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. 

प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची कोरोना चाचणी घेण्यात आली. आज (ता. 2) तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच अंतरगाव सील करण्यात आले. तसेच तिच्या संपर्कातील एकवीस जणांना भंडारी येथील कोवीड सेंटरमध्ये पाठविण्यात आले. 

अंतरगाव संपूर्ण सील करण्यात आले असून, तहसीलदार धीरज थूल, ठाणेदार यशवंत बाविस्कर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शाम शिंदे, अधीक्षक डॉ. सुनील भवरे, मुख्याधिकारी अमोल माळकरसह प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. 
 

संपर्कातील सर्वच क्‍वारंटाईनमध्ये 
अंतरगाव येथील सात महिन्यांच्या मुलीला यवतमाळ येथे उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तिच्या संपर्कात आलेल्या एकवीस जणांना कोव्हिड सेंटरवर क्‍वारंटाईन करण्यात आले. 
डॉ. सुनील भवरे, अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, आर्णी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com