चकमकीत सात नक्षलवाद्यांना कंठस्नान

file photo
file photo

गोंदिया : महाराष्ट्र व छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील बोरतलाव नजीकच्या सीतागोटा पहाडावर पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. यात सात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई आज, शनिवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास छत्तीसगड पोलिसांनी केली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये सहा पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे.
पीपल्स लिबरेशन गुर्रिला आर्मी तथा जनवादी क्रांतिकारी माओवादी संघटनेच्या वतीने 28 ते 3 ऑगस्टपर्यंत शहीद सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे नक्षलग्रस्त भागात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. असे असतानाच आज, शनिवारी महाराष्ट्र व छत्तीसगड सीमेवरील बोरतलावनजीकच्या सीतागोटा पहाडावर पोलिसांची नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात सात नक्षलवादी ठार झाले. घटनेनंतर पोलिसांनी एके-47 रायफल, 12 बोर बंदूक, 303 रायफल, सिंगलशॉट रायफल व अन्य साहित्य जप्त केले.
या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलिसांनी नक्षलग्रस्त भागात अतिदक्षता घोषित केली आहे. सालेकसा, देवरी, चिचगड व केशोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अतिसंवेदनशील गावांमध्ये चोख बंदोबस्त आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गोंदिया एसटी आगाराने सालेकसा, बिजेपार, नवाटोला, चांदपूर, खोलगड, मलाजखंड, फुक्‍कीमेटा, ककोडी, गल्लाटोला, डोंगरगड, डोमाटोला आदी परिसरात जाणाऱ्या बसफेऱ्या रद्द केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com