सात वर्षांत लाचखोरीची 100 प्रकरणे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

गोंदिया - येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 2010 ते 5 नोव्हेंबर 2016 पर्यंत लाचलुचपतची 100 प्रकरणे दाखल झाली. चालू वर्षातील 21 प्रकरणांत 24 आरोपी जाळ्यात अडकले असून, 2015 मध्ये सर्वाधिक 39 प्रकरणांची विभागाने नोंद केली.

गोंदिया - येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 2010 ते 5 नोव्हेंबर 2016 पर्यंत लाचलुचपतची 100 प्रकरणे दाखल झाली. चालू वर्षातील 21 प्रकरणांत 24 आरोपी जाळ्यात अडकले असून, 2015 मध्ये सर्वाधिक 39 प्रकरणांची विभागाने नोंद केली.

भ्रष्टाचाराची कीड नष्ट करण्यासाठी शासनाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना केली. लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रारीच्या आधारे विभागाचे पथक लाचखोरांवर कारवाई करतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे गोंदिया येथे 2010 मध्ये युनिट स्थापन करण्यात आले. पहिल्या वर्षी 2010 मध्ये केवळ एका आरोपीवर कारवाई झाली होती. त्यानंतर कारवाईचा आलेख वाढतच गेला. 2011 मध्ये 5 प्रकरणे, 2012 मध्ये 3, 2013 मध्ये 4, 2014 मध्ये 27, 2015 मध्ये 39 तर, चालू वर्षात 5 नोव्हेंबरपर्यंत 21 प्रकरणांची नोंद विभागाने केली. चालू वर्षातील 21 प्रकरणांत वित्त विभागाचा एक, महसूल विभागाचे 4, वनविभाग दोन, जिल्हा परिषद 4, पोलिस विभाग, आरोग्य विभाग, समाजकल्याण विभाग, सिंचन विभाग, भूमिअभिलेख, पाटबंधारे विभाग व कृषी विभाग प्रत्येकी एक तसेच इतर तीन लोकसेवक अशा 24 आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. 2016 मध्ये तीन सापळा प्रकरण व एका अपसंपदा प्रकरणाचा विशेष न्यायालयात निर्णय लागला. त्यापैकी दोन सापळा प्रकरण व एक अपसंपदा प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने शिक्षा सुनावली.

Web Title: In seven years, 100 cases of bribe