पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला सात वर्षे सक्तमजुरी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जुलै 2019

यवतमाळ : 50 हजारांसाठी पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी पतीला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांनी शनिवारी (ता. सहा) दिला.

दिलीप विठ्ठल धोंगळे (रा. केळझरा (वरठी), ता. आर्णी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दीपाली हिचा विवाह दोन मे 2013 ला झाला होता. लग्नानंतर पतीने तिला तीन महिने चांगले वागविले. दुचाकी घेण्यासाठी माहेरवरून 50 हजार रुपये आणण्याचा तगादा लावून सतत मारहाण करणे सुरू केले. ही बाब विवाहितेने माहेरीदेखील सांगितली. दिलीपला समजही देण्यात आली. या प्रकाराला कंटाळून दीपालीने पारवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, प्रकरण आपसी मिटविण्यात आले. पुन्हा 50 हजारांसाठी छळ करण्यात आल्याने तिने विषारी औषध प्राशन केले. 16 मे 2014 ला उपचारादरम्यान दीपाली धोंगळे हिचा मृत्यू झाला. संगीता वानखडे हिने पोलिसांत तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक संजय शिरभाते यांनी तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven years' right to husband's wifes suicide