सातवा वेतन आयोग ठरला "बिरबलाची खिचडी'

नागपूर :  आंदोलनात सहभागी मनपातील कर्मचारी, शिक्षक.
नागपूर : आंदोलनात सहभागी मनपातील कर्मचारी, शिक्षक.

नागपूर : महापालिकेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग "बिरबलाची खिचडी' ठरल्याचे चित्र असून, शुक्रवारी संविधान चौकात आंदोलनातून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला. महापालिकेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन करीत संताप व्यक्त केला.
राज्य सरकारने महापालिकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे निर्देश दिले. मात्र, यासाठी राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेण्याची अट घातली. त्यामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना अद्याप सातव्या वेतन आयोगानुसार वेतन सुरू झाले नाही. ही अट शिथिल करावी यासह नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, ऐवजदारांना स्थायी करणे आदी मागण्यासाठी शुक्रवारी महापालिका कर्मचारी व शिक्षकांच्या संयुक्त समन्वय समितीने संविधान चौकात सामूहिक रजा आंदोलन केले. सरकारने मागण्या मान्य न केल्यास बेमुदत आंदोलनाचा इशाराही समन्वय समितीच्या नेत्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com