तब्बल सातव्यांदा करणार राजपथ परेडचे नेतृत्व

prajasttak din.jpeg
prajasttak din.jpeg

खामगाव : मुळ खामगाव येथील लक्‍कडगंज भागातील रहिवासी सीआरपीएफचे ठाणेदार सुनील शर्मा हे प्रजासत्‍ताक दिनी दिल्ली येथे सातव्‍यांदा पथसंचलनाचे नेतृत्‍व करणार आहेत. त्‍यामुळे त्‍यांना वरिष्ठांकडून सन्‍मानित देखील करण्यात आले आहे. ही बाब खामगावसाठी गौरवाची आहे.


हे वाचा - आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या एसीबीवर जीवघेणा हल्ला 
लहानपणापासूनच होते आकर्षण

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले सुनील यांचे वडील विष्णू गुलाबचंद शर्मा रा. लकडगंज हे शेगाव येथील एसटी आगारात वाहतूक नियत्रंक म्हणून कार्यरत आहेत. सुनील शर्मा यांनी खामगाव येथील ए. के. नॅशनल हायस्कूल येथे माध्यमिक शिक्षण व गो. से. महाविद्यालयात एम. कॉम पर्यंतचे शिक्षण घेतले. मात्र, लहानपणापासूनच पोलिसांविषयी आकर्षण व मनात देशप्रेम असलेल्या सुनील विष्णू शर्मा यांनी खामगाव येथील १३ एनसीसी बटलियानमध्ये प्रवेश घेवून आपल्या देशप्रेमाला सार्थक असे वळण दिले.

क्लिक करा - शेंद्रीय शेतीचा कसा केला योग्य प्रयोग एखदा बघाच
सर्वस्तरावरून होत आहे कौतुक

सर्वप्रथम १० वर्षांपूर्वी खामगाव बटालियनमधून अमरावती येथे समुहाकरिता तर त्यानंतर अहमदनगर येथे महाराष्ट्र डायरेक्ट परेड कमांडर निवडीकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ सुनील शर्मा यांची सर्वोच एनसीसी डायरेक्ट बॅनर देण्यासाठी निवड करण्यात आली. प्रजसत्ताक दिनी दिल्ली येथे राजपथ परेडवर द्वितीय कमांड म्हणून सुनील शर्मा यांच्या नेतृत्वात होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com