सेक्‍स रॅकेटच्या दलालास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

नागपूर : सेक्‍स रॅकेटवर छापा घातल्यानंतर पळून गेलेला आणि दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुमार ऊर्फ दिलीप शिवाजी गुळवे (41) या दलालाला शहर पोलिसांनी दौलताबाद (जि. औरंगाबाद) येथून अटक केली.

नागपूर : सेक्‍स रॅकेटवर छापा घातल्यानंतर पळून गेलेला आणि दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुमार ऊर्फ दिलीप शिवाजी गुळवे (41) या दलालाला शहर पोलिसांनी दौलताबाद (जि. औरंगाबाद) येथून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीपने धरमपेठ येथील छोटी लाहोरी येथे सेक्‍स रॅकेट सुरू केला होता. तरुणींना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करून घेत होता. ही माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला समजताच सात जून 2019 रोजी कुंटणखान्यावर छापा घातला. छापा पडताच दिलीप पळून गेला. पोलिसांनी हॉटेलमधून तीन तरुणींना ताब्यात घेतले होते. त्यातील एक तरुणी ही कोलकाता येथील होती. या प्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस मागावर असतानाच दिलीप सातत्याने पोलिसांना गुंगारा देत होता. फरार असतानाही तो नागपुरातील आंबटशौकीन ग्राहकांना मुली पुरवीत असल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन काढले असता तो औरंगाबाद येथे असल्याचे समजले. त्यामुळे पीआय उमेश बेसरकर यांनी पथक औरंगाबादला पाठविले. शनिवारच्या पहाटे तीनच्या सुमारास त्याला दौलताबाद-औरंगाबाद महामार्गावर पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी त्याला नागपुरात आणून अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sex racket brokers arrested