नंदनवनमधील हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर छापा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

नंदनवनमधील हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर छापा
नागपूर : नंदनवनमधील घरात सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखेने छापा घातला व युवतीची सुटका केली. सुशीला ऊर्फ शांता गेडाम (रा. सरोदेनगर, नंदनवन) या महिला दलालाला अटक केली.
सुशीला अनेक महिन्यांपासून घरातच कुंटणखाना चालवित होती. तिने काही अल्पवयीन मुली आणि युवतींना सेक्‍स रॅकेटमध्ये ओढले. घरातच आंबटशौकिनांना बोलावून देहव्यापार सुरू होता. याची माहिती पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम यांना मिळाली. त्यांनी लगेच सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला सज्ज करीत कारवाई करण्यास सांगितले.

गुरुवारी सकाळी सुशीलाची पंटरने भेट घेतली आणि मुलीची मागणी केली. तिने मोठी रक्‍कम सांगून पंटरला घरात घेतले. तिने लगेच फोन करून मुलीला बोलावले. स्कूटी घेऊन मुलगी आली आणि थेट बेडरूममध्ये गेली. सुशीला घराचे दार बंद करून बाहेर पहारा देत बसली असताना पोलिसांनी छापा घातला. सुशीलाकडून रक्‍कम आणि पीडित तरुणीला ताब्यात घेतले. नंदनवन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
"सेटिंग'वर भर
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त संभाजी कदम यांनी आतापर्यंत अनेक सेक्‍स रॅकेटवर छापे घालून दहशत निर्माण केली आहे. मात्र, सामाजिक सुरक्षा विभागातील काही कर्मचारी व अधिकारी वरिष्ठांच्या मेहनतीला काळिमा फासत आहे. काही दलालांशी आर्थिक संबंध ठेवून "सेटिंग'वर भर देत आहेत.
गुन्हे शाखेची लपवाछपवी!
दोन महिन्यांपासून शहरातील सेक्‍स रॅकेटचे नेटवर्क उद्‌ध्वस्त करणाऱ्या गुन्हे शाखेचे अधिकारी नंदनवनमधील कारवाईबाबत लपवाछपवी करीत होते. गुन्हे शाखेचे अधिकारी छाप्याची माहिती देण्यास वरिष्ठांचा हवाला देऊन रात्री उशिरापर्यंत टाळाटाळ करीत होते. त्यामुळे या कारवाईवर संशय निर्माण झाला आहे.

Web Title: Sex Racket news