हायप्रोफाइल कुंटणखान्यावर धाड 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर : रेस्टॉरेंट व लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या गुजरनगरातील हायप्रोफाइल कुंटणखान्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने शनिवारी धाड टाकून रशियन मुलीसह तीन युवतींची सुटका केली. लॉजमालकासह चौघांना अटक करण्यात आली आहे. 

नागपूर : रेस्टॉरेंट व लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या गुजरनगरातील हायप्रोफाइल कुंटणखान्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने शनिवारी धाड टाकून रशियन मुलीसह तीन युवतींची सुटका केली. लॉजमालकासह चौघांना अटक करण्यात आली आहे. 
दीपेश कानाबार (35, रा. मातोश्री अपार्टमेंट, सतनामीनगर), सचिन सोनारकर (34, रा. संजयनगर), अंकित वाहने (19, रा. भांडे प्लॉट), राजेश गोखे (35, रा. बापूकुटीनगर, पाचपावली) अशी आरोपींची नावे आहेत. कोतवालीतील भारत गॅस गोडावून, गुजरनगर येथे दीपेश याच्या मालकीचे डी. के. रेस्ट्रॉरेंट, लॉज आहे. सचिन सोनारकर याच्या मदतीने तो लॉजमध्येच कुंटणखाना चालवीत होता. अंकित व राजेश हे ग्राहक शोधण्यासह मुलींची ने-आण करण्यासाठी मदत करीत होते. या ठिकाणी विदेशी तसेच देशातील वेगवेगळ्या भागांतील मुलींना आणून त्याच्याकडून वेश्‍याव्यवसाय करवून घेण्यात येत होता. कुणाला शंका येऊ नये यासाठी दीपेश आणि सचिनने लॉजच्या समोरील भागात टाइल्सचे दुकान लावले होते. येथून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर पाळतही ठेवली जात होती. 
सामाजिक सुरक्षा विभागाला कुंटणखान्यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पंटरला पाठविले. त्याच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी छापा टाकला. लॉजच्या आठ खोल्यांमध्ये कुंटणखाना सुरू असल्याचे समोर आले. येथे ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी आणलेल्या तीन युवती आढळल्या. त्यातील एक रशियाच्या किरगिझस्तानची, एक आसाम तर तिसरी रायपूरची रहिवासी आहे. यापैकी दोघी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीवरून नागपुरात आल्या तर एकीला इंदूरहून बोलावून घेतले होते. मुलींना आणणे-नेण्यासाठी असलेल्या होंडा सीटी कारसह पाच मोबाईल हस्तगत करण्यात आले. कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sex racket news