आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

खामगाव (बुलडाणा) - आदिवासी आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार खामगाव तालुक्‍यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत घडला. या घटनेनंतर पोलिसांनी आज संस्थेच्या अध्यक्षासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला असून, यातील मुख्य आरोपी शाळेचा शिपाई जितूसिंग पवार याच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली.

खामगाव तालुक्‍यातील पाळा येथे स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळा असून, विद्यार्थिनींसाठी निवासी वसतिगृह आहे. या शाळेत हलखेडा (ता. मुक्‍ताईनगर, जि. जळगाव खानदेश) येथील सोळा वर्षांची विद्यार्थिनी इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत होती. दोन महिन्यांपासून शाळेतील शिपाई जितूसिंग पवार हा तिचे लैंगिक शोषण करत होता.

दिवाळीच्या सुटीत घरी गेली असता तिने हा धक्कादायक प्रकार वडिलांना सांगितली. त्यानंतर तिच्या वडिलांनी हिवरखेड पोलिसांत तक्रार नोंदवली. बुधवारी (ता. 2) रात्रीपासूनच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींची धरपकड सुरू केली होती. दरम्यान, आज पीडित विद्यार्थिनीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष गजानन कोकरे, शिपाई जितूसिंग पवार यांच्यासह दहा जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण आज राज्यभर गाजले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अपर जिल्हा पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलिस अधिकारी रूपाली दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चौकशी केली. पीडित विद्यार्थिनीचा "इन कॅमेरा' जबाब नोंदविण्यात आला. या वेळी सरकारी वकील, महिला बालकल्याण अधिकारी उपस्थित होत्या.

फुंडकर यांनी घेतली माहिती
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी खामगाव पोलिस ठाण्याला भेट देऊन प्रकरणाची माहिती घेतली. पीडित विद्यार्थिनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघातील असल्याने त्यांनी या प्रकरणात लक्ष घालून पांडुरंग फुंडकर यांना माहिती दिली. फुंडकर यांनी पोलिस अधीक्षक सोळंके यांची भेट घेऊन प्रकरणाची माहिती घेतली.

Web Title: Sexual exploitation of Asramashala studnets

टॅग्स