धक्‍कादायक... शिक्षकाकडून मुलींचे लैंगिक शोषण

Sexual exploitation of girls by teachers
Sexual exploitation of girls by teachers

सिंदी (रेल्वे) (जि. वर्धा) : सिंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व समुद्रपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गौळ (भोसा) येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने शाळेतील अकरा व आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करीत लैंगिक शोषण केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या घटनेची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सदर शिक्षक सतीश बजाईत वय 49 वर्षे याच्यावर भादंविचे कलम 376 (अइ), 376 (अछ), 506, सहकलम 6 व 10 पॉस्को, 354 (अ), 506 , सहकलम 10 व 12 पोक्‍सो कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्या नराधमास पोलिसांनी समुद्रपूर येथून तत्काळ ताब्यात घेतले.

समुद्रपूर तालुक्‍यातील सिंदी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गौळ (भोसा) जिल्हा परिषदेच्या शाळेत या दोन्ही पीडित विद्यार्थिनी शिकत असून एक पाचवी तर दुसरी तिसऱ्या वर्गाची विद्यार्थिनी असल्याचे सांगितले जाते. याच शाळेत विद्यादानाचे कार्य करणाऱ्या सतीश केशव बजाईत या शिक्षकाने दोन्ही विद्यार्थिनीवर वाईट नजर ठेवून आठ वर्षीय बालिकेवर मागील तीन महिन्यांपासून तीन ते चार वेळा अत्याचार केले.

वेदना असह्य झाल्यावर या मुलीने शाळेत जायला नकार दिल्याने हा प्रकार उघडकीस आला तर दुसऱ्या अकरा वर्षीय मुलीला याने आपले सावज बनवीत कामवासना शमविण्याचा प्रयत्न वारंवार केला. घडलेल प्रकार मुलीने आईवडिलांना सांगितल्यानंतर नराधमाचे बिंग फुटले. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रातही मुली सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत असून, शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचे कृत्य या शिक्षकाने केल्याने गावात शिक्षकाप्रती कमालीचा रोष दिसून येत आहे.

याप्रकरणी सिंदी पोलिसांत शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक आडे, महिला सहायक पोलिस निरीक्षक वंदना सोनवणे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com