बारा वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

अकोला : अल्पवयीन मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचार व त्यांचा खून झाल्याच्या घटना ताज्या असतानाच यासंदर्भात केंद्र सरकारने पोस्को कायद्यातच बदल केला. १२ वर्षांतील मुलांवर होणाऱ्या अत्याचारातील आरोपीला फाशीची शिक्षेचे प्रावधान केल्यानंतर जिल्ह्यात पहिलाच गुन्हा जुने शहर पोलिस स्टेशन हद्दीत घडला.

४० वर्षीय व्यक्तीने १२ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रकार वाशीम बायपास येथे उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

शौचालयास जाणाऱ्या १२ वर्षाच्या मुलाला गजानन आडदाळे (४०) याने पाहिले. त्याने त्याला ५०० रुपये देतो, असे म्हणून मला तुझ्या शरीराला हात लावू दे, असे म्हटले. त्या मुलाने विरोध केल्यावरही गजानन आडदाळे याने त्याच्यावर जबरदस्तीने स्पर्श'करून त्याच्यावर पाठीमागून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करीत त्या अल्पवयीन मुलाने तेथून पळ काढला. त्यानंतर त्याने हा सर्व प्रकार त्याच्या आईवडीलांना सांगितला. त्यांनी लगेच जुने शहर पोलिस स्टेशन गाठले.

ठाणेदार गजानन पडघन यांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी आधी गजानन आडदाळे याला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला आहे. गजानन आडदाळे याला अटक केली असून गुन्हा नोंदविला आहे. केंद्र सरकारने पोस्को कायद्यात केलेल्या बदलानंतरचीही पहिलीच घटना जिल्ह्यात घडली आहे.
- गजानन पडघन, पोलिस निरीक्षक, जुने शहर पोलिस स्टेशन

चार तासांत मुलाचे ‘मेडिकल’
तीन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मुलींच्या वैद्यकीय तपासणीस दिरंगाई'केली. हे प्रकरण ‘सकाळ’ लावून धरल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने संबंधित दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली केली. तसेच तेथे नवा कक्ष स्थापन करून तत्काळ अल्पवयीन मुलांची वैद्यकीय तपासणी अहवालही देण्याचे आदेश दिले होते.

या प्रक्रियेचा फायदा जुने शहर पोलिसांना मंगळवारी झाला. अवघ्या चार तासात पिडीत मुलाची वैद्यकीय तपासणी होऊन अहवालही मिळाला. ठाणेदार गजानन पडघन यांनी यासंदर्भात ‘सकाळ’चे आभार मानले.

Web Title: Sexual Harassment case registered at Akola