कर्जमंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

दारव्हा (जि. यवतमाळ) - पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याची घटना तालुक्‍यातील नायगाव येथे आज उघडकीस आली. याप्रकरणी महिलेने ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

अशीच घटना गेल्या पंधरवड्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्‍यात घडली होती. तेथे बॅंकेच्या व्यवस्थापकाने पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. त्यापाठोपाठ ही घटना उघडकीस आली आहे. 

पीडित महिलेने पोलिस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेण्यासाठी महिलेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेशी संपर्क साधला. सोसायटीचा सचिव दादाराव इंगोले यांची भेट घेतली असता त्यांनी महिलेला पाच नव्हे, तर दहा लाख रुपये कर्ज देण्याचे आश्‍वासन दिले. पीडित महिलेने कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव दाखल केला. 

अर्ज सादर करून पाच ते सहा महिन्यांचा कालावधी झाला, तरीही कर्ज मंजूर झाले नाही. त्यामुळे कर्ज मंजुरीसाठी महिलेने सचिवाला फोन केला असता, त्याने शरीरसुखाची मागणी केली, असे तक्रारीत नमूद केले आहे. सचिवाच्या मागणीची माहिती महिलेने पतीला दिली. त्यानंतर पुन्हा सचिवाशी फोनवर बोलणे झाल्याने त्याने आपली मागणी रेटून धरली. हे संभाषण महिलेने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले. ती क्‍लिप घेऊन पीडितेने दारव्हा पोलिस ठाणे गाठले व सचिव दादाराव इंगोले यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. 

Web Title: Sexual harassment Demand for loan approval yavalmat