लैंगिक अत्याचाराचा निषेध असो, दर्डा हाय हाय..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

अमरावती - लैंगिक अत्याचाराचा निषेध असो.. दर्डा हाय हाय.. अशा घोषणा देत अमरावतीकरांनी यवतमाळ पब्लिक स्कूलमधील लैंगिक अत्याचाराचा काळ्या फिती बांधून तीव्र शब्दात निषेध केला. संस्थेच्या संपूर्ण संचालक मंडळाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

अमरावती - लैंगिक अत्याचाराचा निषेध असो.. दर्डा हाय हाय.. अशा घोषणा देत अमरावतीकरांनी यवतमाळ पब्लिक स्कूलमधील लैंगिक अत्याचाराचा काळ्या फिती बांधून तीव्र शब्दात निषेध केला. संस्थेच्या संपूर्ण संचालक मंडळाविरुद्ध कठोर कारवाईची मागणी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

भारतीय जनता युवा मोर्चा आणि भाजप महिला आघाडीतर्फे स्थानिक राजकमल चौकात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाकचेरीवर धडक दिली. नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी घोषणासुद्धा देण्यात आली. यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थिनींशी घडलेला प्रकार घृणास्पद, मानवतेची हत्या अन्‌ माणुसकीला काळिमा फासणारा आहे. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई होऊन त्यांना शिक्षा व्हावी, असे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सांगितले.

आमचेही पाल्य शाळेत जातात. अशा घटना ऐकल्यावर मन स्वस्थ बसत नाही. डोळ्यांसमोर मुलांचे चेहरे तरळायला लागतात. त्यासाठीच निषेधाद्वारे एक सज्जड इशारा दिला जात आहे. यवतमाळ येथील प्रकाराची कुठेही पुनरावृत्ती होऊ नये; अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा नराधमांना त्यांची जागा दाखवून देईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. शहर अध्यक्ष विवेक कलोती व महिला आघाडीप्रमुख रीना मोकलकर यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. किरण पातूरकर, भाजप उपाध्यक्ष सुरेखा लुंगारे, सुनंदा खरड, तनुजा देशमुख, सुचित्रा बिरे यांच्यासह युवा मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

सर्वच विश्‍वस्तांवर कारवाई व्हावी
घडलेल्या प्रकाराच्या जबाबदारीतून संचालक मंडळ दूर जाऊ शकत नाही, असे सांगत यवतमाळ पब्लिक स्कूल चालविणाऱ्या संस्थेच्या संपूर्ण विश्‍वस्त मंडळाविरुद्ध कारवाई करण्यात यावी. शैक्षणिक संस्थांमधील विघातक प्रवृत्तींना आळा बसलाच पाहिजे, असे सुरेखा लुंगारे म्हणाल्या.

Web Title: sexual harassment kishor darda