ऑटोचालकाचा शाळकरी मुलावर लैंगिक अत्याचार

Rape
Rape

नागपूर - मुलाला शाळेत पोहोचवून देण्याऱ्या ऑटोचालकाने नवव्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यावर वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी आटोचालकाला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून मानसिक विकृतीतून हे कृत्य केल्याचे उघडकीस आले. राजेंद्र पांडुरंग ससारने (वय ४५, पन्नासे लेआऊट, स्वावलंबीनगर) असे आरोपी ऑटोचालकाचे नाव आहे.

आरोपी राजेंद्र हा गेल्या दहा वर्षांपासून आटो चालवितो. तो सोनेगाव परिसरात राहणाऱ्या शाळकरी मुलांना शाळेत पोहोचविण्याचे काम करतो. त्याला पत्नी व दोन मुली आहेत. फिर्यादीचा १३ वर्षीय मुलगा बंटी (बदललेले नाव) हा समता नगरातील एका नामांकित शाळेत नवव्या वर्गात शिकतो. त्याचे वडील एका कंपनीत अकाउंटंट असून आई गृहिणी आहे. मोठी बहीण बारावीला असून राजेंद्र तिलाही शाळेत सोडून देण्याचे काम करीत होता.

त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून बंटीच्या घरी त्याचे येणे-जाणे होते. बहीण कॉलेजला गेल्यानंतर तो बंटीला शाळेत सोडून देत होता. गेल्या १ जुलै २०१६ ला त्याने बंटीला शाळेतून घरी परत आणत असताना त्याने ऑटो थेट स्वतःच्या घरी नेला. त्याने घरात कुणीही नसल्याची संधी साधून बंटीशी अनैसर्गिक कृत्य केले. कुणालाही सांगितल्यास आई-वडील आणि बहिणीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे बंटी गप्प बसला. यानंतर तो घरी कुणी नसल्याची संधी साधून बंटीला वारंवार घरी नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता. सलग दोन वर्षांपासून लैंगिक शोषण त्याने केले. ११ एप्रिलला बंटीला त्याने ट्यूशनवरून परत आणल्यानंतर घरी नेले. त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर घरी सोडून दिले. मात्र, तो लगेच आजारी पडला. पोटात दुखायला लागले आणि गुदद्वारातून रक्‍तही येत असल्याची तक्रार त्याने आईकडे केली. आईने लगेच डॉक्‍टरांकडे नेले आणि उपचार घेतले. डॉक्‍टरांच्या प्रकार लक्षात आला मात्र बंटी सांगायला तयार नव्हता.

शेवटी त्याला भावनिक आधार दिल्यानंतर त्याने राजेंद्रच्या कुकृत्याचा पाढा वाचला. ते ऐकून आईच्या पायाखालची जमीन सरकली. पालकांनी सोनेगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक संजय पांडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ऑटोचालक राजेंद्रला अटक केली.

पालकांनो सावधान..!
नोकरदार आईवडील मुलांना आटोचालक किंवा शाळेच्या बसचालकाच्या भरोशावर बिनधास्त सोडतात. त्यामुळे चालक मुली किंवा मुलांशी लैंगिक चाळे करतात. पालकवर्ग मुलांशी मनमोकळेपणाने संवाद साधत नसल्यामुळे याचा खुलासा होत नाही. तसेच पालकांचा डोळे झाकून ऑटोचालकांवर विश्‍वास असतो. तेथेच दगाफटका होतो. यापूर्वी, गिट्टीखदानमध्ये धनाढ्य असलेल्या नववीच्या विद्यार्थिनीला बसचालकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे पालकांनी वेळीच सावधगिरी बाळगायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com