महिलांच्या फोटोवर लज्जास्पद कमेंट्‌स

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

नागपूर  : ट्रिपल तलाक विधेयक मंजूर झाल्याचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या मुस्लिम महिलांना ट्रोल करून सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल लज्जास्पद टीका केल्याचे प्रकरण मानकापूर पोलिसांत पोहोचले. पोलिसांनी हीना नामक महिलेच्या तक्रारीवरून नजीर अल्तमश, गुलाम जिलानी, झैदी शोएब आणि मोहम्मद सोहेल या चौघांवर आयटी ऍक्‍टनुसार गुन्हा दाखल केला.

ट्रिपल तलाक विधेयक मंजूर झाल्याच्या आनंदात भाजपच्या वतीने गेल्या आठवड्यात उपराजधानीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुस्लिम महिलाही त्यात सहभागी झाल्या. बुरख्यातील या महिलांनी लाडू खाऊ घालत आनंद व्यक्त केला. ते फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले. त्या फोटोवरून नजिर, गुलाम, झैदी आणि सोहेल यांनी हीना या महिलेबाबत आक्षेपार्ह विधान असलेला मजकूर सोशल मीडियावर अपलोड केला. त्यामुळे सनाने मानकापूर पोलिसांत सोमवारी रात्री तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून उपरोक्त चौघांविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री पुन्हा काही महिला मानकापूर ठाण्यात पोचल्या. त्यांनीही या संबंधाने तक्रार नोंदविल्याची माहिती आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shameful comments on a photo of women