शंकर चांडकचा जामीन नाकारला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

शंकर चांडकचा जामीन नाकारला
नागपूर : पुलगाव स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर चांडक याला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन नाकारला. ट्रकमधून दारूगोळा उतरविताना 20 नोव्हेंबरला एका बॉक्‍सचा जोरदार स्फोट झाला होता. त्यात एकूण सहा कामगारांचा बळी गेला. 18 कामगार जखमी झाले आहेत.

शंकर चांडकचा जामीन नाकारला
नागपूर : पुलगाव स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी शंकर चांडक याला आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अटकपूर्व जामीन नाकारला. ट्रकमधून दारूगोळा उतरविताना 20 नोव्हेंबरला एका बॉक्‍सचा जोरदार स्फोट झाला होता. त्यात एकूण सहा कामगारांचा बळी गेला. 18 कामगार जखमी झाले आहेत.
शंकर चांडक हा अधिकृत कामगार पुरवठा कंत्राटदार आहे. कंत्राटदार धोकादायक काम असताना त्यासाठी अकुशल व अप्रशिक्षित कामगारांची नेमणूक करीत होता. शेतमजूर व शेतकऱ्यांकडून काम करून घेत होता. बॉम्बस्फोट झाल्यानंतर कंत्राटदार चांडकविरुद्ध देवळी पोलिसांनी सदोष मनुष्यवध व सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न असे दोन गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी चांडकने वर्धा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज खारीज झाला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. न्या. मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष आज सुनावणी झाली. चांडकतर्फे वरिष्ठ अधिवक्ता अविनाश गुप्ता तर, सरकारतर्फे ऍड. हर्षवर्धन धुमाळे यांनी कामकाज पाहिले.
अकुशल कामगारांचा वापर
ऑर्डनन्स फॅक्‍टरी खामरिया, जबलपूर (मध्य प्रदेश) येथील दोषपूर्ण व मुदतबाह्य दारूगोळा नष्ट करण्यासाठी पुलगाव, जि. वर्धा येथील केंद्रीय दारूगोळा भांडारमध्ये आणण्यात आला होता. जोखमीचे व अतिसंवेदनशील काम असते. त्यामुळे तज्ज्ञ चमूच्या निरीक्षणाखाली हे काम केले जाते. परंतु, खड्डे खोदणे, दारूगोळा ट्रकमधून खाली उतरवणे, तज्ज्ञ सांगतील त्या ठिकाणी दारुगोळा पोहोचविणे आदी कामांसाठी कामगारांची आउटसोर्सिंग केली जाते. अशा कामगारांची आउटसोर्सिंग आरोपी चांडककडून करण्यात आली होती.

Web Title: Shankar Chandak's bail denied