Naxal Attack: जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मे 2019

महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या कारवाया ही नित्याची बाब झाली आहे. राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. सोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 

मुंबई: महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या कारवाया ही नित्याची बाब झाली आहे. राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. सोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पवार म्हणाले की, महाराष्ट्रदिनी गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेडा भागात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात 15 एस.आर.पी.एफ. जवानांसह चालक मृत्यूमुखी पडला. गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना 'जनाची नाही तरी मनाची'  लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही.

सबब नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दूसरा पर्याय नाही, असेही शरद पवार म्हणाले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar demands CM Devendra fadnavis resignation