ती म्हणते, मी अमरावतीत असुरक्षित!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

अमरावती : पोलिसांच्या पोर्टलवरून एका युवतीने मी अमरावतीत युवकाच्या त्रासामुळे असुरक्षित असल्याची तक्रार रात्री अकराच्या सुमारास नोंदविली. पोलिस आयुक्तांनी त्याची तडकाफडकी दखल घेत तिला त्रास देणाऱ्या उच्चशिक्षित युवकाला तासाभरात अटक केली.

अमरावती : पोलिसांच्या पोर्टलवरून एका युवतीने मी अमरावतीत युवकाच्या त्रासामुळे असुरक्षित असल्याची तक्रार रात्री अकराच्या सुमारास नोंदविली. पोलिस आयुक्तांनी त्याची तडकाफडकी दखल घेत तिला त्रास देणाऱ्या उच्चशिक्षित युवकाला तासाभरात अटक केली.
शहरात एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीची हत्या झाली. त्यानंतर पोलिसांवर कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून प्रचंड आरोप झाले. त्यामुळे युवती व महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी म्हणून पोलिसांनी मदतीचे प्रयत्न विविध स्तरावरून सुरू केले. त्यात ऑनलाइन तक्रारीचेही एक माध्यम उपलब्ध करून दिले होते. पीडित युवतीने शनिवारी रात्री पोलिसांच्या पोर्टलवरून दोन लाइनची तक्रार केली. ती तक्रार पोलिस आयुक्त संजय बाविस्कर यांनी बघितली. तत्काळ कारवाईसाठी सायबर पोलिसांकडे वर्ग केली. पीडित युवतीने मोबाईलवर मॅसेज पाठवून त्रास देणाऱ्या युवकाचे नाव विशाल हरिश्‍चंद्र पाटील (रा. देवीनगर, वडाळी) दिले होते. सायबर पोलिसांनी ही तक्रार गाडगेनगर पोलिसांकडे वर्ग केली. पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी तक्रारीचा आधार घेत युवतीला मॅसेज पाठविणाऱ्या वडाळी परिसरातील विशालला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती. ऑनलाइन तक्रारीनंतर सीपी आणि त्यानंतर गाडगेनगरचे पोलिस निरीक्षक यांनी दाखविलेल्या तत्परतेने तत्काळ युवकास अटक झाली. विशालविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी रविवारी (ता. 14) दुपारी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिस अधिकारी स्वत: फिर्यादी झाले.
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She says, I am unsafe in Amravati!