तुझे कोनावर काही प्रेम वगैरे ?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

लग्नाच्या रेशिम गाठी जुळवताना मनातील दोरी मजबूत असणे आवश्यक असते, मात्र परिस्थितिशी जुळवणूक करीत लग्नाचा घाट घातल्यास इप्सित साधेलच याबाबत मात्र ठाम सांगता येत नाही,  अशा स्थितीत एखादेवेळी कधी अपमान समोर येऊन उभा ठाकेल याची शाश्वती नसते, मागील आठवड्यात जुन्या दर्यापुरातील एका सधन कुटुंबातील मुलीला बघण्यास पाहुणे आल्यानंतर घडलेला प्रकार साऱ्यानांच अचंभित करीत विचार करण्यास भाग पाडणारा आहे.

दर्यापुर- लग्नाच्या रेशिम गाठी जुळवताना मनातील दोरी मजबूत असणे आवश्यक असते, मात्र परिस्थितिशी जुळवणूक करीत लग्नाचा घाट घातल्यास इप्सित साधेलच याबाबत मात्र ठाम सांगता येत नाही,  अशा स्थितीत एखादेवेळी कधी अपमान समोर येऊन उभा ठाकेल याची शाश्वती नसते, मागील आठवड्यात जुन्या दर्यापुरातील एका सधन कुटुंबातील मुलीला बघण्यास पाहुणे आल्यानंतर घडलेला प्रकार साऱ्यानांच अचंभित करीत विचार करण्यास भाग पाडणारा आहे.

एम. ए. झालेल्या मुलीचे लग्न करण्याच्या विचारांनी पितृतुल्य मंडळी कामाला लागली होती, नातेवाईक, मित्रमंडळींना उपवर मुलगा बघून सूचित करण्याची विनंती करण्यात आली होती, त्यानुसार सर्वच कामाला लागले होते, एके दिवशी अकोला जिल्ह्यातील मंडळीचा मुलगी बघायला येण्याचा दुरध्वनी आल्याने घरची मंडळी आनंदात होती,

दुपारच्या वेळी नातेवाइकांसोबत पाहुणे घरी आले, यथासांग स्वागत झाल्यावर गप्पा रंगल्या, मुलीला बघण्याची विनंती केली, त्यानुसार घराच्या संस्कारानुसार उपवर मुलीने दर्शन दिले, मुलाने मुलगी बघून वडिलांच्या कानात पसंत असल्याची हमी भरली, मात्र एक अट घालीत एकांतात बोलाण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानुसार वडिलांनी मुलीच्या घरच्यांना सुचना दिली, घरातीलच एका खोलीत व्यवस्था करण्यात आली, मुलगा अन् मुलगी दोघेही बोलण्यास गेले, मुलगा पुण्याला कंपनीत नोकरी करीत असल्याने त्याने लग्न झाल्यावर तुला ही नोकरी करावी लागेल म्हणुन सांगितले, मुलीने काहीच उत्तर दिले नाही, आणखी काही प्रश्न झाले, त्यावर ही काहीच उत्तर मिळाले नाही, हं हूं असेच उत्तरे येत गेली, काही कळायला मार्ग नव्हता, जरा अंतर धरून बसलेला मुलगा आता जवळ आला होता, बोलायचा प्रयत्न करीत होता, अशातच मुलाने खाजगी जीवनाबाबत प्रश्न विचारला, तुझे कोनावर काही प्रेम वगेरे ! यावर मुलगी चिडली, मला असे आवडणार नाही सांगितले, यावर मुलाने गंमत करावी म्हणुन माझे ही प्रेम आहे पण तीला सोडून मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पुढे बघू काय ते ! म्हटल्याने शब्द वाढले, पुढे खोलितील वातावरण गरम झाले, यात एका वाक्याने बिघडले, चिडून उपवर मुलीने आता सहन होत नाही सांगितले, राग अनावर झाला अन त्यात उपवर मुलीने कुठलाही विचार न करता उपवर मुलाच्या सणसणीत कानाखाली हाणली.

अन् तडक खोली बाहेर निघुन गेली, इकडे गप्पात रंगलेल्या मंडळी ना काहीएक खबर नव्हती, अपमानित झालेला मुलगा बाहेर आला अन घरच्या मंडळीना ही मुलगी नको म्हणुन सांगितले, विचारपुस झाली, पण नको म्हटले, साऱ्यांनी समजावले पण आता संपले होते, लग्न जुळायच्या आतच ते मोडले होते.

Web Title: she slapped her story in daryapur amrawati