बंद शेड झाले सुरू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

या शेडचा रुग्णांना कोणताही फायदा होत नसल्याची बाब सकाळने उजेडात आणली. शेडच्या बाजूलाच रुग्ण उकाड्यात उभे असतात, असे चित्र या परिसरात दररोज सकाळी 9 ते 1 या वेळेत असते

नागपूर - उन्हाळ्यात रुग्णांना सावलीचा दिलासा मिळावा, या हेतूने रुग्णांसाठी शेड तयार करण्यात आले. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून ते कुलूपबंद होते. नुकतेच आठ दिवसांपूर्वी बुटीबोरी कंपनीतील कामगार उकाड्यात बसला होता. रुग्णांना सावली देणारे शेड बंद करण्यामागचे कारण विचारले असता प्रशासनाने चुप्पी साधली होती. ही बाब दै. "सकाळ'ने प्रकाशात आणली आणि शेड रुग्णांसाठी खुले करण्यात आले. शुक्रवारी (ता.12) आमदार सुधाकर कोहळे यांच्या हस्ते उद्‌घाटन होणार आहे.

कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपचारासाठी विदर्भात सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा रुग्णालय एकमेव आधार आहे. येथील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, या हेतूने लाख रुपये खर्चून शेड तयार केले. परंतु, हे शेड तयार झाल्यानंतरही कुलूपबंद आहे. या शेडचा रुग्णांना कोणताही फायदा होत नसल्याची बाब सकाळने उजेडात आणली. शेडच्या बाजूलाच रुग्ण उकाड्यात उभे असतात, असे चित्र या परिसरात दररोज सकाळी 9 ते 1 या वेळेत असते.

कामगार नेते मुकुंद मुळे यांनी रुग्णांचे ऊन, पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी शेड तयार करण्याची मागणी केली होती. अभ्यागत मंडळात सदस्य असल्याने त्यांनी ही मागणी प्रशासनाकडे लावून धरली. मुळे यांची मागणी राज्य कामगार विमा योजना प्रशासनाने मान्य केली. शेड बांधला; परंतु बंद ठेवल्याने मुळे यांनीही नाराजी व्यक्त केली. नुकतेच शेड उघडण्यात आले. यामुळे उपचारासाठी येणाऱ्या कामगार कुटुंबीयांचे उन्हापासून संरक्षण होईल, असे मत इंटकचे नेते मुकुंद मुळे यांनी व्यक्त केले.

Web Title: shed reopens in nagpur