एटापल्लीत आढळली नक्षलवाद्यांची पत्रके

एटापल्ली (जि. गडचिरोली) : येथे आढळलेली माओवाद्यांची पत्रके.
एटापल्ली (जि. गडचिरोली) : येथे आढळलेली माओवाद्यांची पत्रके.

एटापल्ली (जि. गडचिरोली) : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला एक दिवस शिल्लक असताना एटापल्ली तालुक्‍यात नक्षलवाद्यांची पत्रके आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शनिवारी (ता. 19) एटापल्ली तालुक्‍यातील जंगल परिसरात नक्षलवाद्यांची विविध पत्रके आढळून आली. या पत्रकांमध्ये काश्‍मीरला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370 आणि 35 "ए'बद्दल व्यापक जनआंदोलन निर्माण करा, काश्‍मीरवरील मोदी सरकारच्या आक्रमणाची निंदा करा, काश्‍मिरींच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराचे समर्थन करा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पत्रकावर भाकप (माओवादी), असे लिहिले आहे. विशेष म्हणजे, या पत्रकांमध्ये स्थानिक मुद्दे हाताळण्याऐवजी नक्षलवाद्यांनी काश्‍मीरच्या मुद्द्यावर आपली भूमिका जाहीर केली आहे. मात्र, अनेकदा नक्षलवाद्यांचा निवडणुकीला, मतदानाला विरोध असतो. त्यामुळे या काळात त्यांच्याकडून जिल्ह्यात हिंसक कारवाया होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com