शिरीष देव हवाई दल उपप्रमुखपदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नागपूर - एअर मार्शल शिरीष देव यांची हवाई दल उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्याच्या महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आलेल्या ऍड. रोहित देव यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत. पाठोपाठ झालेल्या या नियुक्तींमुळे नागपूरच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

शिरीष देव यांची नियुक्ती एअर मार्शल बिरेंदर सिंग धनोआ यांच्या जागी करण्यात आली. देव हवाई दलाचे वेस्ट कमांड चीफ म्हणून कार्यरत आहेत. देव यांच्या जागी एअर मार्शल सी. हरिकुमार यांची नियुक्ती होणार आहे. शिरीष देव एक जानेवारी 2017 पासून पदभार स्वीकारतील.

देव हवाई दलात 1979 मध्ये दाखल झाले. तीन दशकांहून अधिकच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बऱ्याच महत्त्वपूर्ण पदांवर कार्य केले. देव पहिले फाइटर कॉम्बॅट लीडरदेखील राहिले आहेत. त्यांनी डिफेन्स सर्विसेज स्टाफ कॉलेज वेलिंग्टन येथे शिक्षण घेतले. गेल्या वर्षी त्यांना परम विशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Shirish deo air force deputy chief