शिवसैनिकांना हवे दोन शहर प्रमुख 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

नागपूर - शहरात दोन जिल्हा प्रमुख नेमावे, अशी मागणी शिवसैनिकांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. इतर मोठ्या शहरांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक शहर प्रमुख असल्याचेही शिवसैनिकांनी निदर्शनास आणून दिले. त्या दृष्टीने हालाचाली सुरू झाली आहेत. 

नागपूर - शहरात दोन जिल्हा प्रमुख नेमावे, अशी मागणी शिवसैनिकांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. इतर मोठ्या शहरांमध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक शहर प्रमुख असल्याचेही शिवसैनिकांनी निदर्शनास आणून दिले. त्या दृष्टीने हालाचाली सुरू झाली आहेत. 

शिवसेनेने जिल्हा प्रमुख म्हणून प्रकाश जाधव यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी अद्याप कार्यकारिणी जाहीर केली नाही. जाधवांचे कार्य ग्रामीण भागात जास्त आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार होते. हिंगणा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूकसुद्धा लढविली आहे. त्यामुळे दोन जिल्हा प्रमुख देऊन जबाबदारीची विभागणी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. उद्धव ठाकरे यांनीसुद्धा यास संमती दर्शविल्याने शिवसैनिकांमध्ये हालचाली सुरू झाली आहेत. विशाल बरबटे आणि राजू तुमसरे यांना शहर प्रमुख म्हणून नियुक्त करण्याचे जवळपास निश्‍चित झाल्याचे समजते. 

असंतोष कायमच 
सतीश हरडे यांना हटवून प्रकाश जाधव यांची जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याने शिवसेनेमध्ये जोष निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यांनी सुरुवात आक्रमक केली. मात्र, त्यांचा उत्साह मावळल्याचे दिसून येते. आठ दिवसांच्या आत कार्यकारिणी जाहीर केली जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र अद्यापही कार्यकारिणी तयार झाली नाही. उलट असंतोष आणखी उफाळून आला आहे. काही माजी पदाधिकारी व नगरसेवकांमध्ये विश्‍वासात घेत नसल्याने नाराजी आहे. शुक्रवारी प्रकाश जाधव यांनी कार्यकारिणीचा विषय उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडला. मात्र, नागपूरमधून जातपर्यंत कुठलाही निर्णय झाला नाही. 

Web Title: Shiv Sainiks want two city chief