शिवसेना 108 जागेवर मानली?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

नागपूर : बरोबरीने जागा मिळाव्या यासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेला 108 जागांवर मनविण्यात भाजपला यश आले आहे. पितृपक्ष आटोपताच येत्या रविवारी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीच्या जागेची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

नागपूर : बरोबरीने जागा मिळाव्या यासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेला 108 जागांवर मनविण्यात भाजपला यश आले आहे. पितृपक्ष आटोपताच येत्या रविवारी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीच्या जागेची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.
मागील निवडणुकीत युती तुटल्यानंतर भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढली होती. भाजपचे 122 तर शिवसेनेचे 63 उमेदवार निवडून आले होते. सत्तेसाठी भाजप-सेनेची पुन्हा युती झाली. महाराष्ट्रातील लोकसभेतही युती कायम होती. कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेवर येण्याची संधी मिळू नये यासाठी विधानसभेतही युती कायम ठेवण्याचा निर्णय दोन्ही पक्षाने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे युती होणारच असे ठामपणे सांगत आहेत. मात्र, जागा वाटपावरून बिनसल्याचेही वृत्त होते. भाजप व शिवसेनेच्या काही उत्साही नेत्यांच्या परस्पर घोषणा आणि वक्तव्याने युतीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अलीकडेच राज्यात येऊन गेलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भाषणात युतीबाबत चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे युती तुटणार असे तर्क लावल्या जात होते. तत्पूर्वी "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युला शिवसेनेतर्फे देण्यात आला होता. मात्र, 112 आमदार असल्याने भाजपने यास विरोध दर्शविला. महाजनादेश यात्रेदरम्यान भाजपने सिटिंग-गेटिंग सोडून फिफ्टी-फिफ्टी असा प्रस्ताव समोर केला. यास शिवसेनेने विरोध दर्शवला होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena on 108 seats?