शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv sena activists attack convoy of mla santosh bangar

शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडी

अंजनगावसुर्जी : आमदार बांगर हल्ला प्रकरणातील दहा शिवसैनिकांना अंजनगावसुर्जी न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती. त्याप्रकरणात आणखी चार जणांना अटक केली असून सर्व चौदाही जणांना आज (ता.२७) अंजनगावसुर्जी न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांनाही न्यायालयीन कोठडी सुनावली.

याप्रकरणात पोलिसांनी शिवसेनेचे महेंद्र दीप्टे, राजेंद्र आकोटकर, अभिजित भावे, गजानन चौधरी, सुनील ऊर्फ गजानन हाडोळे, रवींद्र नाथे, गजानन विजेकर, शरद फिसके, मयूर रॉय, गजानन फाटे, अंकुश रमेशराव गुजर, प्रवीण ज्ञानेश्वर नेमाडे, विनोद सुखदेवराव पायघन, अंकुश रामभाऊ दातीर यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात झाली आहे.

दरम्यान, दुसऱ्या दिवशीसुद्धा अंजनगाव न्यायालयाच्या परिसरात असंख्य शिवसैनिकांनी गर्दी केली होती. गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी अंजनगाव न्यायालयात चोख पोलिस बंदोबस्त होता. शिवसैनिकांना मध्यवर्ती कारागृहात नेत असताना शिवसेना जिंदाबादचे नारे देण्यात आले. माजी खासदार अनंत गुढे यांनी आज (ता.२७) सकाळीच अंजनगावसुर्जी पोलिस ठाण्यात येऊन सर्व शिवसैनिकांची चौकशी केली. सध्याच्या सरकारमधील आमदार, मंत्री हे बेताल वक्तव्ये करीत असल्याने असे प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले.