अमरावतीच्या आठ मतदारसंघांत खाते उघडण्याची सेना, राष्ट्रवादीची लगबग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

अमरावती : जिल्ह्याच्या आठ विधानसभा मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी विजय मिळविण्यात शिवसेना तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसला 2014 च्या निवडणुकीत यश आले नाही. त्यामुळे यंदा खाते उघडण्याच्या दृष्टीने या दोन्ही पक्षाच्या मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत.
सद्यस्थितीत मोर्शी, मेळघाट, अमरावती व दर्यापूर हे चार मतदारसंघ भाजपकडे आहेत. धामणगावरेल्वे आणि तिवसा या मतदारसंघावर कॉंग्रेसची पकड मजबूत असून याठिकाणी कॉंग्रेसचे आमदार आहेत. अचलपूर व बडनेरा मतदारसंघ अपक्ष आमदारांकडे आहे. 2014 च्या निवडणुकीत युती किंवा आघाडी झाली नसल्याने सारेच पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते.

2009 मध्ये भाजप-सेनेचा 50-50 चा फार्म्युला होता. धामणगावरेल्वे, अमरावती, मेळघाट व मोर्शी हे चार मतदारसंघ भाजपकडे होते तर बडनेरा, तिवसा, दर्यापूर व अचलपूर या चार मतदारसंघांत शिवसेनेने लढत दिली होती. हाच फार्म्युला या वेळी कायम राहतो की त्यात बदल केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत कॉंग्रेसने पाच जागा लढविल्या होत्या, तर राष्ट्रवादीसाठी मोर्शी व बडनेरा हे मतदारसंघ सोडण्यात आले होते. आघाडीतील घटकपक्ष असलेल्या रिपाइंला दर्यापूरची जागा या दोन्ही पक्षांनी दिली होती. कॉंग्रेसने पाचपैकी चार जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता आली नाही. दर्यापूरची जागासुद्धा आघाडीने गमावली होती. विशेष म्हणजे, 2009 च्या निवडणुकीत भाजपचा एकही आमदार जिल्ह्यात निवडून आला नाही. शिवसेनेने मात्र कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या रूपात दर्यापुरात खाते उघडले होते. ही एकच जागा युतीच्या वाट्याला आली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसने या वेळी बडनेऱ्याऐवजी अमरावतीच्या जागेवर दावा केला असून मोर्शीत राष्ट्रवादीचा कोणता उमेदवार रिंगणात येतो याची उत्सुकता ताणल्या गेली आहे. सद्यस्थितीत भाजप, कॉंग्रेस व अपक्ष असेच सत्ता समीकरण अमरावती जिल्ह्यात आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचे आमदार राहावेत, यादृष्टीने राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच शिवसेनेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

मतदारसंघ अदलाबदलाच्या हालचाली
बडनेरा हा मतदारसंघ शिवसेनेच्या रडारवर आहे. मात्र, भाजप हा मतदारसंघ सोडण्यास तयार नसल्याची माहिती आहे. तर शिवसेनेकडे असलेला तिवसा मतदारसंघ भाजपकडे यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाची अदलाबदल होण्याची चिन्हे आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shiv sena and ncp news amravati district