कोरोना विरुद्ध लढा : शिवसेना सदस्यही सरसावले; देणार एक महिन्याचे मानधन

rupees.jpg
rupees.jpg

अकोला : कोरोनाच्या विरोधातील लढाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिवसेना पक्षाचे 13 जिल्हा परिषद सदस्य, एक अपक्ष सदस्य व पातुर पंचायत समितीच्या सभापती त्यांचे एक महिन्याचे मानधन (प्रवास भत्ता) मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार आहेत. यासंदर्भात पक्षाचे गटनेता व जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांनी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांना निवेदनच दिले आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी हातभार म्हणून आमदार व खासदार एक महिन्याचा पगार देणार असून, आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत शिवसेनेचे 13 जिल्हा परिषद सदस्य, एक अपक्ष व पातुर पंचायत समितीच्या सभापती त्यांचे एक महिन्याचे मानधन (प्रवास भत्ता) मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देणार आहेत. पक्षाचे गटनेता गोपाल दातकर यांनी यासंबंधीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देवून सदस्यांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याची विनंती केली आहे.

या सदस्यांचे मानधन होणार जमा
गोपाल दातकर, अप्पू तिडके, गोपाल भटकर, प्रशांत अढाऊ, गणेश बोबडे, संजय अढाऊ, संदीप सरदार, गायत्री कांबे, सुनिता गोरे, वर्षा वझीरे, लता पवार, गीता मोरे, अनुसया राऊत, लक्ष्मी डाखोरे (सभापती पंचायत समिती पातुर) व अपक्ष सदस्य गजानन पुंडकर यांचा समावेश आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com