shivsena-congress-ncp
shivsena-congress-ncp

सेना-राष्ट्रवादीचे नगरसेवक कॉंग्रेसच्या वाटेवर

नागपूर - शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून काही विद्यमान नगरसेवक आणि पदाधिकारी कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याची विश्‍वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. महापालिकेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असताना पक्षनेतृत्वाकडून कुठलीच ठोस उपाययोजना केली जात नाही आणि निवडणुकीसाठी कुठलेच पाठबळ मिळत नसल्याने सर्व अस्वस्थ आहेत.

शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मोजके नगरसेवक आहेत. मोठी व्होटबॅंकसुद्धा नाहीत. चार वॉर्डांचा प्रभाग करण्यात आल्याने निवडणूक जिंकण्यासाठी मोठी ताकद लागणार आहे. ती दोन्ही पक्षांकडे नाही. स्वबळावर लढल्यास एका प्रभागात चार तगडे उमेदवार सापडणे अवघड आहे. अशा परिस्थितीत निवडणूक जिंकणार कशी याची चिंता अनेकांना भेडसावत आहे. यातही अंतर्गत गटबाजी आणि भांडणे अजूनही संपलेली नाही. शिवसेनेत दोन वर्षांपूर्वीच उभी फूट पडली आहे. माजी जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे यांच्या समर्थकांना निलंबित करण्यात आले होते. अलीकडेच त्यांना पक्षात परत घेण्यात आले. त्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री असली तरी विजयाची नाही. माजी नगरसेवक प्रवीण सांदेकर आधीच कॉंग्रेसमध्ये सामील झाले आहेत. प्रवीण गवरे यांनीही प्रवेश केला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत काही नगरसेवक लवकरच कॉंग्रेसमध्ये सहभागी होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही अशीच परिस्थिती आहे. देशमुख आणि पाटील वाद क्षमलेला नाही. काही नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते फक्त नावापुरते पक्षात आहेत. ते चांगल्या संधीच्या शोधात आहे. भाजपात उमेदवारी मिळणे शक्‍य नाही. त्यापेक्षा समविचारी कॉंग्रेसला त्यांच्या पहिली पसंती आहे. दोन्ही पक्षातील अंतर्गत खदखद निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी बाहेर येण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या परिस्थिती, प्रभागपद्धती लक्षात घेता कॉंग्रेस आणि भाजप या दोनच पक्षांत मुख्य लढत होणार आहे. नगरसेवक किशोर डोरले, किशोर गजभिये, माजी नगसेवक मनोज सांगोळे, ऋषी कारोंडे, प्रवीण सांदेकर यांनी आधीच कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com