तूर खरेदी प्रश्नावरून शिवसेनेचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

अकोला - तूर खरेदी प्रश्नावरून जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयावर शुक्रवार (ता.१८) दुपारी १२ वाजल्यापासून जवळपास चारशे शेतकऱ्यांसह शिवसेनेने आंदोलन केले.

शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयात प्रवेश केला. अधिकाऱ्यांच्या खुर्चीला तूर वाहून आपला रोष व्यक्त केला. 

कार्यालयात अधिकारी नसल्याने शिवसैनिकांना निवेदन देता आले नाही. मात्र, अधिकाऱ्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर काढून तिला तूर वाहण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत शासकिय धोरणाचा निषेध केला. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख, श्रीरंग पिंजरकर यासह शेकडो कार्यकर्ते यावेळी आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेत प्रकरण शांततेत हाताळले आहे.

Web Title: Shiv Sena's movement on the purchase of tur