शिवशाहीच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

कारंजा -  नागपूर कडून येणारी शिवशाही बसने कारंजा बस्थानकावर जाण्याऱ्या वृद्ध महामार्ग ओलांडताना भरधाव येणारी शिवशाही बसने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे.

कारंजा -  नागपूर कडून येणारी शिवशाही बसने कारंजा बस्थानकावर जाण्याऱ्या वृद्ध महामार्ग ओलांडताना भरधाव येणारी शिवशाही बसने धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे.

मृत रामभाऊ नारायण कामडी (वय 70 वर्ष, रा. परसोडी) हा मुलगा विलास रामभाऊ कामडी (वय 38 रा परसोडी) याला टायफॉईड आजाराने ग्रस्त असल्याने कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होता. त्यामुळे घरातील कुटुंब शेतीची कामाची लगभग असल्याने कुटुंब शेतात कामाला गेले असल्याने आजारी मुलाचा जेवणाचा डब्बा रामभाऊ नारायण कामडी (वय 70 रा.परसोडी)  याना आणावा लागल्याने मुलाला जेवणाचा डब्बा रुग्णालयात पोहचून दिला. मुलाने जेवण केलं जेवण झाल्यानंतर वडील रामभाऊ कामडी गावाला परत जाण्यासाठी निघाले कारंजा बस स्थानक वर जाताना महामार्ग ओलांडावा लागतो. तेव्हा मृतक रामभाऊ कामडी रस्ता ओलांडत असताना अचानक नागपूर कडून अमरावती कडे जाणारी भरधाव वेगात येणारी शिवशाही समोरील धडक दिली. यात मृतक काही अंतरावर फेकला गेला रस्त्यावर पडला असता त्यांच्या अंगावरून शिवशाही गेली असल्याने जागीच मृत्यू झाला.

लोकांची गर्दी होणार या कारणावरून शिवशाही चालक आर एस रामटेके यांनी टोल नाक्यावर जाऊन थांबवली यात काही लोक शिवशाहीच्या मागे धावल्याने अखेर त्याला शिवशाही थांबवावी लागली यात शिवशाही बसला कारंजा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. या घटनेत कारंजा पोलीस तपास करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Web Title: shivashahi bus hit old man death on the spot