अमरावतीत या ठिकाणी मिळते "शिवभोजन'... वाचा

thali
thali

अमरावती : जिल्ह्यातील शिवभोजन योजनेचा प्रारंभ पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (ता. 26) कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी उपाहारगृह येथे झाला.

बाजार समितीसह अमरावती मध्यवर्ती बसस्थानक येथील एस. टी. उपाहारगृह, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय येथेही शिवभोजन थाळी योजनेला सुरुवात झाली. तीनही केंद्र प्रत्येकी शंभर थाळींचे आहे.

लाभार्थ्यांचा ऍपमध्ये घेणार फोटो
विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अशोक दहिकर, संचालक प्रफुल्ल राऊत, प्रकाश कोकाटे, प्रवीण बिचकुले, उमेश गोरडे, मिलिंद तायडे, प्रवीण भुगुल, सचिव दीपक विजयकर, धीरज कोकाटे, राजेंद्रकुमार भटकर आदी या वेळी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी पहिली थाळी लाभार्थ्याला देऊन योजनेला सुरुवात केली. प्रत्येकी एक वाटी वरण, भाजी, प्रत्येकी 30 ग्रॅमच्या दोन चपात्यांचा समावेश असलेल्या थाळीचा आस्वाद अनेक लाभार्थ्यांनी घेतला. पालकमंत्र्यांनी या वेळी उपाहारगृहाची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवादही साधला.

गोरगरिबांना जेवण मिळावे, हा योजनेचा हेतू आहे. छत्रपती शिवरायांच्या कल्याणकारी राज्याची संकल्पना त्यामागे आहे, असे पालकमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
जिल्ह्यासाठी 500 थाळ्यांचे उद्दिष्ट आहे. गरीब व गरजू व्यक्तींना केवळ दहा रुपयांत ताजे भोजन मिळणार असल्याने ही योजना गरीब आणि गरजूंसाठी वरदान ठरणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी सांगितले.

एका दिवशी एकच थाळी
शिवभोजन थाळी घेणाऱ्या लाभार्थ्याचे नाव मोबाईल ऍपमध्ये नोंदविले जाईल. लाभार्थ्याचे छायाचित्र तसेच लाभार्थ्याकडे असल्यास त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून घेतला जाईल. दुपारी 12 ते 2 या वेळेत ही थाळी तीनही केंद्रांत मिळणार आहे. एका दिवशी एका व्यक्तीला एकच थाळी दिली जाईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com