शिवभोजन मिळते तर खरे, पण प्लॅस्टिक पिशवीत

Shiv-bhojan.j
Shiv-bhojan.j

गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाने अनेक आदेश लागू केले. अनेक व्यवसाय, सरकारी उपक्रम बंद करण्यात आले, मात्र या काळात कोणतीही व्यक्‍ती उपाशी राहू नये, म्हणून शिवभोजन थाळी केंद्र सुरूच ठेवण्यात आले. परंतु शिवभोजन थाळी देण्यासाठी पॉलिथिनचा वापर सुरू केला. आणि गरजूंना पार्सल सुविधेचा लाभ दिला. मात्र, या पार्सल सुविधेमुळे पॉलिथिन बंदी कायद्याचा फज्जा उडाला आणि नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्‍न उपस्थित झाला. याकडे अन्न व औषधी विभागासह पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे.

कोणतीही व्यक्‍ती उपाशी राहू नये, त्याला पोटभर अन्न मिळावे, या दृष्टीने युती सरकारच्या काळात झुणका भाकर केंद्र सुरू करण्यात आले होते. तेव्हा, अनेक गरीब, मध्यमवर्गीयांसह धनाढ्यांनीही या योजनेचा लाभ घेत झुणका भाकरीचा आस्वाद घेतला. कालांतराने ही योजना बंद झाली. परंतु, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर तोच विचार मनात ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाउन होण्यापूर्वी शिवभोजन थाळीचा गाजावाजा करीत शुभारंभ केला.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत नागरिकांना सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी केंद्राची उभारणी केली. परंतु, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र संकट काळ असताना या काळात शिवभोजन थाळी केंद्र बंद न करता सुरू ठेवण्यात आले. या काळात हातावर पोट असणाऱ्या मजूरांसह अनेकांचे हाताचे काम हिरावले गेले.

उद्योगधंदे, खासगी सेक्‍टर बंद झाले. या कठीण परिस्थितीत जीवन जगणे कठीण झाले होते. परिणामी, अनेक कुटुंबांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. या काळात राज्यातील सरकारने गोरगरिबांना पोटभर अन्न मिळावे, म्हणून शिवभोजन थाळी केंद्र बंद न पाडता सुरूच ठेवले. इतकेच नव्हे शिवभोजन थाळी मागील तीन महिन्यांपासून दहा रुपयांना न विकता थेट पाच रुपयात विकणे सुरू केले.

सविस्तर वाचा - मोबाईलच्या कारणावरून आई रागावल्याने मुलाची आत्महत्या

या काळात गरजवंतांनी शेकडोंच्या संख्येत रांगेत उभे राहून शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. परंतु, हळूहळू परिस्थिती पूर्वस्थितीत येताच जुलै महिन्यापासून पुन्हा शिवभोजन थाळीची विक्री दहा रुपयांना सुरू केली आहे. आता ही थाळी प्लॅस्टिक पिशवीत दिली जात आहे. त्यामुळे आजार उद्भवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.
संपादन - स्वाती हुद्दार

 
संपादन - स्वाती हुद्दार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com