शिवस्मारकाचे काम पावसाळ्यानंतर- आ. विनायक मेटे

संजय सोनोने
रविवार, 8 जुलै 2018

येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे हे सध्या राज्य दौऱ्यावर असून पक्षाची ते नव्याने बांधणी करीत आहे या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सोमवारी आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्य शासनाच्या सध्याच्या कामकाजावर समाधान व्यक्त करीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामकाजाचे कौतुक केले. पावसाळ्यानंतर छत्रपती शिवरायांचे स्मारकाचे काम सुरू होईल असा विश्वास मेटेंनी दर्शविला आहे.

शेगाव (बुलडाणा)- अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्यासंदर्भातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. सदर स्मारकाचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले, असून छत्रपती शिवाजी महाराजांचे हे जागतिक किर्तीचे स्मारक लवकरात लवकर व्हावे यासाठी प्रयत्न असून पावसाळ्यानंतर हे काम सुरु झाले असल्याचे आपल्याला दिसेल असे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे यांनी आज(रविवार) सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सोमवारी एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायकराव मेटे हे सध्या राज्य दौऱ्यावर असून पक्षाची ते नव्याने बांधणी करीत आहे या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे सोमवारी आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राज्य शासनाच्या सध्याच्या कामकाजावर समाधान व्यक्त करीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामकाजाचे कौतुक केले. पावसाळ्यानंतर छत्रपती शिवरायांचे स्मारकाचे काम सुरू होईल असा विश्वास दर्शविला.

येत्या निवडणुकांमध्ये आपण भाजपासोबत युती कराल का या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, भाजपामध्ये शिवसंग्रामवार आता पर्यंत झालेला अन्याय दूर करून सन्मानाने भाजपा सर्वांना सोबत घेईल असा विश्वास मला आहे. त्यामुळे शिवसंग्राम हा कदाचित भाजप सोबतच राहील असे सूतोवाच मेटे यांनी केले. बुलढाणा जिल्ह्यातील मा जिजाऊ यांच्या शहरासाठी विकास आराखडा मंजूर करण्यात आला मात्र दुर्दैवाने त्याचे भूमिपूजन आज पर्यंत झाले नाही ही बाब राज्य शासनासनाला कमीपण आणणारी आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या आतापर्यंतच्या कारभारावर आपण समाधानी आहात का असा प्रश्न विचारला असता मेटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करीत शासनाच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला अजय बिल्लारी, पंजाबराव देशमुख, सौ.वंदना निकम आदींची उपस्थिती होती.

Web Title: Shivsammars work after the monsoon says Vinayak Mete