शिवसंग्रामचे मुंडन आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

बाळापूर येथील गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी  आज ‘शिवसंग्राम’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या देऊन मुंडन आंदोलन केले.

 

अकोला - बाळापूर येथील गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्या निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी  आज ‘शिवसंग्राम’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या देऊन मुंडन आंदोलन केले.

बाळापूर येथील गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांच्यावर अकोल्यातील एका माजी नगरसेविकेचा विनय भंग केल्याचा गुन्हा दाखल असून या अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीचे निवेदन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २४ मे रोजी दिल्यानंतर ‘शिवसंग्राम’च्या युवक आघाडीच्या वतीने आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या देऊन मुंडण आंदोलन करीत गट विकास अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी केली यावेळी शिवसंग्रामचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  

Web Title: shivsangram agitation in balapur akola