आज शिवसेना इच्छुकांच्या मुलाखती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नागपूर : शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखाती शनिवारी (ता. 14) मुंबई येथे घेण्यात येणार आहेत. याकरिता जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांच्यासह अनेक इच्छुकांनी मुंबई गाठली आहे.

नागपूर : शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखाती शनिवारी (ता. 14) मुंबई येथे घेण्यात येणार आहेत. याकरिता जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव यांच्यासह अनेक इच्छुकांनी मुंबई गाठली आहे.
युतीमध्ये नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दोन तर शहरात दक्षिण नागपूर असे तीन मतदारसंघ होते. युती तुटल्यानंतर आता सर्व मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला कुठल्या जागा सोडण्यात येतील, याविषयी उत्सुकता आहे. प्रकाश जाधव यांनी दक्षिण आणि पूर्व नागपूर विधानसभा अशा दोन जागेवर दावा केला आहे. यापैकी एका जागेवर लढण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. माजी उपमहापौर किशोर कुमेरियासुद्धा दक्षिणमधून लढण्यास उत्सुक आहेत. ग्रामीणमधील रामटेक मतरासंघातून आशीष जयस्वाल तीनवेळा विजय झाली आहेत. मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. काटोलमध्येही आत भाजपचे आमदार आहेत. सावनेर मतदारसंघात मागील निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यामुळे शिवसेनेने सावनेरवरही दावा केला आहे. मात्र त्यावेळी भाजपचा उमेदवार येथे नव्हता. भाजपच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज पडताळणीत रद्द झाला होता. मुख्यमंत्र्यांचे शहर असल्याने नागपूरमधून शिवसेनेला किती जागा सोडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena, election