'नवनीत कौर राणा यांना शिवसेनेच निवडून आणलं'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार यांना शिवसैनिकांनीच पाडलं का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. अमरावतीत शिवसेनेतली अंतर्गत वाद उफाळला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर उद्या रविवारी अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसेनीकाची बैठक बोलावली आहे.

अमरावती : लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार यांना शिवसैनिकांनीच पाडलं का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. अमरावतीत शिवसेनेतली अंतर्गत वाद उफाळला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर उद्या रविवारी अमरावतीच्या पदाधिकारी आणि शिवसेनीकाची बैठक बोलावली आहे.

शिवसेनेचे अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनंतराव अडसूळ यांचा पराभव शिवसेनेचे माजी खासदार अनंतराव गुढे यांनी केलेल्या गदारींमुळेच झाल्याची तक्रार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे अभिजीत अडसूळ यांनी केली आहे.

नवनीत रवी राणा यांचा विजय आणि आभार रॅली मधील माजी खासदार अनंतराव गुढे यांचा पत्नीने खासदार नवनीत रवी राणा यांचा सत्कार करून दिलेल्या शुभेच्छा. याचे व्हिडिओ, तसंच फोटोग्राफ मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हवाली करण्यात आले आहेत. आनंदराव अडसूळ यांच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या रविवारी मातोश्रीवर बेठक बोलावली आहे.या बेठकीला अनंतराव गुढे यांना तातडीनं बोलवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena Ex MLA alleges on Shivsena EX MP Anantrao Guddhe