युतीचा पहिला बळी; भाजप मंत्र्याच्या विरोधात लढण्यासाठी सेना आमदाराचा राजीनामा?

युतीचा पहिला बळी; भाजप मंत्र्याच्या विरोधात लढण्यासाठी सेना आमदाराचा राजीनामा?

लोकसभा 2019 ः चंद्रपूर : वरोरा विधानसभेचे आमदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसचा हात पकडणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. सोमवारी (ता. 04) वरोरा येथे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या पदाधिका-यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी शिवसैनिकांची मते जाणून घेण्यात आली.

शिवसैनिकांनी पाठिशी उभे राहण्याबाबत धानोरकरांना आश्वस्त केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्यावर अनेक वर्षे विश्वास दाखविला. भाजपने मागील चार वर्षात पक्षनेतृत्व आणि शिवसैनिकांचा अपमान केला. त्यामुळे नाइलाजास्तव सेनाला जय महाराष्ट्र करावा लागत असल्याचे धानोरकर म्हणाले.

शिवसैनिकांशी चर्चा करताना आमदार धानोरकर भावूक झाले होते. आमदार धानोरकरांचे बंधू अनिल धानोरकर हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून, भद्रावतीचे नगराध्यक्ष आहेत. मागील 20 वर्षांपासून भद्रावतीवर भगवा फडकविण्याची किमया धानोरकरांनी करून दाखविली आहे. पूर्व विदर्भातील ते शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत. संभाव्य काँग्रेस प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

धानोरकरांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेमुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. धानोरकर हे काँग्रेसचे लोकसभेचे  उमेदवार राहतील. धानोरकरांच्या उमेदवारीने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या समोर मोठे आव्हान राहील, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. बैठकीनंतर धानोरकर लगेच दिल्लीकडे रवाना झाल्याची विश्वसनीय सूत्राने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com