शिवसेनेकडून आता भाजपच्या ‘फेक न्यूज’ची पोलखोल 

Shivsena targeted BJP's 'Fake News'
Shivsena targeted BJP's 'Fake News'

अकोला : राज्यात सत्तेत खुर्चीला खुर्ची लावून बसलेल्या भाजप-शिवसेना या मित्र पक्षातील मतभेद टोकाला पोहोचले आहे. शिवसेनेने मित्र पक्षाला अडचणीत पडकण्याची एकही संधी सोडलेली नाही. आता चार वर्षात केलेल्या कामांचे भाजपतर्फे जे दावे केले जात आहेत. त्यातील ‘फोलपणा’ शोधून काढण्यासाठी शिवसेनेने सोशल मीडियातून आघाडी उघडली आहे. भाजपच्या फेकन्यूजची पोलखोल करणारी माहिती देण्याचे आवाहन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून फेसबुक व व्हॉटस्अॅप सारख्या सोशल मीडियातून केले जात आहे.

राज्यात आणि केंद्रातही शिवसेना सत्तेत आहे. मात्र, सुरुवातीपासूनच शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद झाले. परिणामी सत्ते असूनही शिवसेना मित्र पक्ष भाजपच्या विरोधात कायम विरोधी पक्षाची भूमिका बजावत आली आहे. सत्तेतून बाहेर न पडता शिवसेनेने भाजपविरुद्ध आघाडीच उघडली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्‍न असो किंवा राज्य सरकारचे निर्णय शिवसेनेने विरोध केला नाही, असा एकही प्रसंग घडला नाही. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीनंतर तर या दोन्ही पक्षातील मतभेदांनी टोक गाठले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप आणि तेवढ्याच ताकदीने मुख्यमंत्र्यांकडून मिळालेले प्रत्युत्तर यामुळे दोन्ही पक्षातील टोकाचा वाद उफाळून आला आहे.

त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने आता भाजपने केंद्र आणि राज्यात केलेल्या कामांच्या बाबात जे दावे केले जात आहे, त्याची पोलखोल करण्यासाठी आघाडी उघडली आहे. चार वर्षात मोदी सरकारने काय केले याच्या अलिकडे अनेक पोस्ट व्हायलर झाल्या आहेत. सोशल मीडियावरून त्या मोठ्याप्रमाणावर व्हायलर केल्या जात असल्याने नागरिकांची दिशाभूल होत असल्याचा दावा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या दावांमधील फोलपणा उघड करणारी माहिती ज्यांच्याकडे आहे. त्यांनी ती पुराव्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे द्यावी, ती सोशल मीडियातून व्हायलर केली जाईल. असे आवाहन शिवसेनेच्या एका फेसबुक खात्यावरून केले जात आहे. 

‘हॅस फेकन्यूज एक्स्पोज’

‘हॅस फेकन्यूज एक्स्पोज’ या नावाने शिवसेनेचे चिन्ह असलेल्या फेसबुक खात्यावरून भाजपच्या दाव्यांची पोलखोल करणाऱ्या पोष्ट टाकणे व त्यावर प्रतिक्रिया देण्याचे आवाहन केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com