शोभा कउटकर पुन्हा नगराध्यक्षपदी

file photo
file photo

कळमेश्वर (जि.नागपूर): अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेस स्थगिती देण्याचे लेखी आदेश दिल्याने मोहपा नगर परिषदेच्या अध्यक्ष शोभा कउटकर यांना नगर विकास मंत्रालय मंत्रालयाने आदेश काढून अपात्र घोषित केले होते. या आदेशाच्या विरोधात नगराध्यक्ष शोभा कउटकर यांनी न्यायालयात धाव घेतली. नगरविकास मंत्रालयाने केलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधात न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. न्यायालयाचे आदेश मिळताच मोहपा नगरपरिषदेसमोर आमदार सुनील केदार, माजी जि.प. विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे व सत्ताधारी नगरसेवक यांनी फटाक्‍यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला.
महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत केंद्र शासन पुरस्कृत आयएचएसडीपी योजनेअंतर्गत 193 घरकुलाचे बांधकाम करण्यात आले. त्यापैकी 31 घरकुलात मंजूर लाभार्थी व्यतिरिक्त नागरिकांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे मूळ लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित झाल्याने त्याअनुषंगाने मोठ्‌या पोलिस बंदोबस्तात तत्कालीन न. प. मुख्य अधिकारी हरिचंद्र टाकरखेडे यांनी 27 एप्रिल 2018 रोजी तत्कालीन कनिष्ठ बांधकाम अभियंता संतोष मुरुकुलवार यांना अतिक्रमण हटकून पावसाळ्यापूर्वी लाभार्थ्यांना घरकुल प्रदान करण्याचे आदेश दिले. परंतु, नगराध्यक्षांनी पत्र क्रमांक 678/2018 , 16 मेअन्वये ही अतिक्रमण हटवण्याची मोहीम स्थगित करण्याचे आदेश दिल्याने मोहीम थांबवण्यात आली होती. त्यांनी सरकारी कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवत महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965च्या कलम पाचमधील तरतुदीनुसार 13 सप्टेंबरपासून नगराध्यक्ष पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात आले होते. शासनाची ही कार्यवाही राजकीय हेतूने प्रेरित असल्याची चर्चा होती. आता उच्च न्यायालयाने अपात्रता प्रकरणावर स्थगितीचे आदेश दिल्याने सत्ताधा-यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी राज्यमंत्रयांच्या या आदेशावर स्थगिती दिली. तर शोभा कौटकर यांच्यातर्फे ऍड. राधिका बजाज व आनंद जयस्वाल यांनी काम पाहिले. कोर्टाने काल स्थगिती दिल्यानंतर आज परत पुन्हा एकदा आमदार सुनील केदार यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष कौउटकर यांनी पदभार सांभाळला यावेळी माजी जी. प. सददस्य मनोहर कुंभारे, नगरसेवक राजेश नेरकर, शाम खरबडे, फरजाना शेख, सुरेखा हिरटकर, शबाना पटेल, लता सरोदे, शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष मुन्ना बोराडे आदींची उपस्थिती होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com