पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा "शॉक'ने मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

सावरगाव (जि.नागपूर) : मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास स्मशानभूमीजवळील नदीत पोहायला गेलेल्या करण सुरेश हिरुडकर (वय 18) या युवकाचा करंट लागून मृत्यू झाला. स्मशानभूमीतील संरक्षक कंपाउंडला लागून असलेल्या खांबाला अर्थिंग आल्यामुळे युवकाचा स्पर्श झाल्याने ही घटना घडली.

सावरगाव (जि.नागपूर) : मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास स्मशानभूमीजवळील नदीत पोहायला गेलेल्या करण सुरेश हिरुडकर (वय 18) या युवकाचा करंट लागून मृत्यू झाला. स्मशानभूमीतील संरक्षक कंपाउंडला लागून असलेल्या खांबाला अर्थिंग आल्यामुळे युवकाचा स्पर्श झाल्याने ही घटना घडली.
सविस्तर माहितीनुसार, स्मशानभूमीजवळ असलेल्या नदीत हा तरुण पोहायला गेला होता. पोहणे झाल्यानंतर तारेच्या कंपाउंडवरून उडी घेत असताना त्याचा हात बाजूला असलेल्या विजेच्या खांबावरील अर्थिंगच्या तारेला लागला. त्यात विजेच्या धक्‍क्‍याने त्याचा मृत्यू झाला. त्याला काटोल येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले.वीज मंडळाच्यावतीने मदत मिळावी, याकरिता गावातील नागरिकांनी युवकाचा मृतदेह ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणल्यामुळे गावामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जोपर्यंत वीज मंडळ मदत घोषित करत नाही व मृताच्या भावाला नोकरीची हमी देत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेतली. गावातील तणावाचे वातावरण बघता गावात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वीज मंडळाचे काटोल विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सी. सी. दारवेकर, सावरगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नारायण वैरागडे, कनिष्ठ अभियंता सावरगाव राहुल हेडाऊ, ए. के. एन. एजन्सीचे ठेकेदार अवधेश कुशवाहा यांनी या वेळेस मृताच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत तसेच वीज मंडळाकडून नुकसानभरपाई चार लाखांची मदत तसेच मृताच्या भावाला आउटसोर्सिंग कामगार म्हणून नोकरी देण्याचे लिखित आश्वासन दिले. त्यानंतरच मृतदेह उचलण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shock death of swimmer

फोटो गॅलरी