३० लाख लोकंख्येच्या नागपुर शहरात मलेरियाचे ३ रुग्ण !

Shocking : Only 3 malaria patients in Nagpur city of 30 lakh population!
Shocking : Only 3 malaria patients in Nagpur city of 30 lakh population!

नागपूर : यंदा कोरोनाचा महास्फोट झाला. यामुळे इतर आजाराकडे आरोग्य यंत्रणेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. मलेरियाने नागपूर वगळता पूर्व विदर्भात मलेरियाने हातपाय पसरले आहेत. मात्र ३० लाखाच्या नागपूर शहरात अवघे ३ मलेरियाग्रस्त आढळून आले आहेत. २५ लाखाच्या ग्रामीण भागातही अवघे ३ मलेरियाचे रुग्ण आढळले. यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ९५७ मलेरियाग्रस्त आढळून आले आहेत. गडचिरोलीतील स्थानिक आरोग्य प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. मात्र नागपूर जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण भागात ९ महिन्यात अवघे ६ रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागपूर जिल्ह्यातील आकडेवारी फसवी आहे की, खरी हे मात्र गुलदस्त्यात आहे. पूर्व विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांत मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत मलेरिया १ हजार ६८३ रुग्ण आढळले आहेत. यातील 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर २०२० या ९ महिन्यांच्या कालावधीत मलेरियाचे ५ हजार ४३८ रुग्ण आढळले आहेत. तर १२ मृत्यू झाले आहेत. मृत्यूमध्येही ७ ने वाढ झाली आहे. नागपूर शहरात मलेरिया नियंत्रण मोहीम गेल्या ९ महिन्यांपासून थंडबस्त्यात आहे. यानंतरही मलेरियाचे रुग्ण आढळून आले नाही, यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

तीन महिन्यात वाढले साडेतीन हजार मलेरियाग्रस्त 
विशेष असे की, पूर्व विदर्भात यार्षी जून २०२० पर्यत १ हजार ७९४ मलेरियाग्रस्त आढळून आले होते. यात ५ मृत्यू झाले होते. आरोग्य विभागाच्या पुणे येथील कार्यालयात ही माहिती नोंदविली आहे. जुलै ते सप्टेंबर २०२० या ३ महिन्यांत ३ हजार ६४४ मलेरियाग्रस्त पूर्व विदर्भात वाढले. जानेवारी ते सप्टेंबर २०२० या कालावधीत मलेरियाचा आकडा फुगून ५ हजार ४३८ वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा १२ वर पोहोचला आहे. 


मलेरियाचे आढळलेले रुग्ण 
(१ जानेवारी ते ३० सप्टेंबर२०१९) 
......................................... 
जिल्हा रुग्ण मृत्यू 

............................................ 
नागपूर (ग्रा) -९ -१ 
नागपूर (शहर) -१ -० 
भंडारा -६ -० 
गोंदिया -१६ -३ 
चंद्रपूर -३८ -० 
चंद्रपूर (ग्रा) - ० -० 
गडचिरोली -१४०९ -१ 
वर्धा -४ -० 
---------- 

मलेरियाचे आढळलेले रुग्ण 
(१ जानेवारी ते ३० सप्टेंबर२०२०) 
नागपूर (ग्रा) -३ -० 
नागपूर (शहर) -३ -० 
भंडारा -७ -२ 
गोंदिया -७७ -२ 
चंद्रपूर -१६८ -३ 
चंद्रपूर (ग्रा) - ० -० 
गडचिरोली -४९५७ -५ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com