शॉर्ट सर्किटमुळे झालेली पिकांची नुकसान भरपाई महिन्यात देणार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

नागपूर - राज्यात विजेच्या जुन्या तारा तुटल्यामुळे आणि विजेचे खांब पडल्यामुळे होत असलेल्या शेतपिकांची नुकसान भरपाई तीस दिवसांत देण्याची कालमर्यादा घालून दिली जाईल. तसेच नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.

या संदर्भात विरोधी पक्षनेचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. या वेळी विखे यांच्यासह आमदार बाळासाहेब थोरात, बाळासाहेब पाटील, सुजित मिणचेकर, जयकुमार गोरे आदी सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले होते. शेतातून जाणाऱ्या विजेच्या तारांमुळे राज्यात सातत्याने अपघात होत असतात. अनेकदा जीवितहानी, वित्तहानी मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, घटनेनंतर शेतकरी अनेक महिने मदतीपासून वंचित असतात. याबद्दलही सर्व सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विखे यांनी नुकसानीची माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांना टोल फ्री क्रमांक, ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन देण्याचीही मागणी केली.

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्‍त्या 3 महिन्यांत करा या वेळी आमदार जयकुमार गोरे यांनी ग्रामीण भागात लाइनमनच्या जागा रिक्त असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मंत्री बावनकुळे म्हणाले, ""राज्य सरकारने 23 हजार ग्राम विद्युत व्यवस्थापक नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. ग्रामसभांनी त्यांच्यास्तरावर आयटीआय इलेक्‍ट्रिकल्सची नियुक्ती करावी त्यासाठी आमदारांची पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. त्यांना महावितरणकडून प्रशिक्षण दिले जाईल. तसेच जी गावे तीन महिन्यात ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नियुक्ती करणार नाहीत अशा ठिकाणी महावितरणकडून त्यांच्या नियुक्‍त्या केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: The short circuit will damage crops in compensation