आई म्हणाली, झोपेतून ऊठ ना रे लवकर...संतापलेल्या मुलाने केले हे...वाचाच

file photo
file photo

आमगाव (जि. गोंदिया) : तालुक्‍यातील बाह्मणी येथे एका मुलाने कुऱ्हाडीच्या दांड्याने वार करून जन्मदाती आईचा खून केल्याची घटना मंगळवारी (ता. 28) सकाळी उघडकीस आली आहे. मीनाबाई मनिराम शेंडे (वय 55, रा. बाह्मणी) असे त्या मृत माउलीचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी मुलगा प्रमोद शेंडे (वय 38) याला पोलिसांनी अटक केली आहे.

बाह्मणी येथील प्रमोद शेंडे हा नेहमीप्रमाणे मंगळवारी (ता. 28) सकाळी साडेसहा वाजता त्याच्या गोठ्यातील पलंगावर झोपला होता. मात्र दुपार होऊनही तो झोपेतून जागा झाला नाही. त्यामुळे दुपारी दोनच्या सुमारास त्याच्या आई मीनाबाईने गोठा स्वच्छकरण्याचे ठरविले. त्यानंतर मीनाबाई गोठ्यात आली व झोपलेल्या प्रमोदला हाका मारून उठवू लागली.

माझी झोप का मोडतेस

दरम्यान, मला दररोज सकाळी सकाळी उठवून माझी झोप मोडत असतेस, असे म्हणून प्रमोदने बाजूला असलेली कुऱ्हाड उचलून रागाच्या भरात तिच्यावर दांड्याने सपासप वार केला. यात रक्तबंबाळ झालेल्या मीनाबाईला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, गंभीर जखमी असल्याने तिला उपचारासाठी गोंदिया येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी केली मुलाला अटक

मृत महिलेचा पती मनिराम शेंडे (वय 58) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी मुलाला अटक केली. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक श्‍याम काळे व त्यांची चमू करीत आहे. एका क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात मुलाने मातेचा खून केल्याने समाजमन हेलावले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com