पोलिसांची डुकरांमागे धावाधाव

नागपूर :  डुकर पकडल्यानंतर सुरक्षित ठिकाणी घेऊन जाताना एजन्सीचे कर्मचारी.
नागपूर : डुकर पकडल्यानंतर सुरक्षित ठिकाणी घेऊन जाताना एजन्सीचे कर्मचारी.

नागपूर : शहरात डुकरांचा उपद्रव वाढला असून, महापालिकेने पोलिस बंदोबस्तात त्यांना पकडण्याची मोहीम सोमवारपासून पुन्हा सुरू केली. पहिल्याच दिवशी चाळीस डुकरे पकडली असून, मालकांनी तीव्र विरोध केला. परंतु, पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले. महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर नियुक्त केलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांसोबत पोलिसांनीही डुकरे पकडण्यासाठी धावाधाव केली.
महापालिकेच्या दहाही झोनमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात डुकरांच्या उपद्रवाची तक्रार केली होती. पालकमंत्री बावनकुळे यांनी डुकरे पकडण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते. महापालिकेने डुकरे पकडण्यासाठी मोहीम सुरू केली. परंतु, एजन्सीने डुकरांच्या मालकामुळे पोबारा केला. आता पुन्हा तमिळनाडू येथील एजन्सीला प्रायोगिक तत्त्वावर डुकरे पकडण्याचे काम दिले.
सोमवारपासून डुकरांना पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. डुकरांच्या मालकांची धमकी बघता महापालिकेने पोलिसांची मदत घेतली. पाच पोलिसांनी या मोहिमेला संरक्षण दिले. पहिल्याच दिवशी भिवसेनखोरी व गिट्टीखदान परिसरात चाळीस डुकरे पकडण्यात आली. डुकरांना अज्ञात सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. डुकरांना शहरापासून दोनशे किमी दूर निर्जनस्थळी सोडण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com