उत्कृष्ट खेळाडूंसाठी आता "शौर्य मिशन'

सुरेश नगराळे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

गडचिरोली  : आदिवासी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा तसेच देशपातळीवर खेळामध्ये त्यांना संधी मिळावी, या हेतूने आदिवासी विकास विभागातर्फे "शौर्य मिशन' उपक्रम राबविले जाणार आहे. या उपक्रमासाठी नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांतील 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर, अहेरी, गडचिरोली, देवरी व चंद्रपूर एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचा समावेश आहे.

गडचिरोली  : आदिवासी विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा तसेच देशपातळीवर खेळामध्ये त्यांना संधी मिळावी, या हेतूने आदिवासी विकास विभागातर्फे "शौर्य मिशन' उपक्रम राबविले जाणार आहे. या उपक्रमासाठी नागपूर विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळांतील 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर, अहेरी, गडचिरोली, देवरी व चंद्रपूर एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचा समावेश आहे.
वितमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळांच्या तीन विद्यार्थ्यांनी माउंट एव्हरेस्ट शिखर चढण्याची किमया केली होती. अशाच उपक्रमासाठी पुन्हा एकदा "शौर्य मिशन'मधून 50 आदिवासी विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यांना बर्फाळ प्रदेशात विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
गडचिरोली प्रकल्पातील कुरुंडीमाल येथील शासकीय आश्रमशाळेचा संदीप मयाराम उसेंडी, निरसो रामसाय गावडे (रांगी), रूपाली रामसु किरंगे (सोडे), संदीप बाजीराव नैताम, संजय तुलावी, उषा प्रभुदास ठाठमुर्रा, श्‍यामसिंग सज्जन कोरे, रविता गोटा (सर्व कोरची), लच्चा दुग्गा वेलादी (पेरमिली), संजय तोरेम (बामणी), विमल मेकला (बामणी), मनोहर पिल्लो (बामणी), पवनकुमार मडावी (बामणी), सुनील मज्जी, मनोज महाका, लक्ष्मण मडावी, सुरेश तलांडी, विशाल मडकामी (पेरमिली), सुनील सिडाम (जिमलगट्टा), धनराज नरोटी (बोरगाव), शंकर मडावी (कडीकसा), नीलेश आत्राम, गोविंदराव मडावी, विपुल मरस्कोल्हे, सूरज नैताम, तेरूकला रायसिडाम, रंजित कुळसंगे, अरुण तोडासे, मेघनाथ येरमे, गुलाब सिडाम, प्रांजली चिकराम, श्रावणी जुमनाके, रिता कुमरे, राहुल नैताम (देवाडा), काजल पुसनाके, आचल टेकाम, कविता टेकाम, मनीषा कन्नाके, कविता सोयाम, आकांक्षा घोडाम (बोर्डा), अक्षय धुर्वे, सविता उईके, प्रल्हाद आडमाची, स्वप्नील आत्राम, अतुल धुर्वे, विशाल वरखडे, चंद्रशेखर आत्राम, विशाल सलाम (कवडस) व रामटेक येथील संदीप कोंदो या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
अकरा मुलींचा समावेश
हे सर्व 50 विद्यार्थी नववी व अकरावीत शासकीय आश्रमशाळामध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा, विभागीय तथा प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो व वैयक्तिक खेळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 11 मुलींचा समावेश आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shourya mission scheme for best player